VIDEO : लग्न मंडपामध्ये येणाऱ्या नवरीला पाहून नवरदेवाला आली चक्कर, पुढे काय झाले पाहा व्हिडीओमध्ये!

लग्नामधील अनेक खतरनाक व्हिडीओ (Video) नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी नवरदेव-नवरीच्या जेवणाचा व्हिडिओ, कधी लग्नादरम्यानचे मजेशीर क्षण तर कधी ब्युटी पार्लरमधून वधूचा लूक अशा नानाप्रकारचे लग्नाशी संबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

VIDEO : लग्न मंडपामध्ये येणाऱ्या नवरीला पाहून नवरदेवाला आली चक्कर, पुढे काय झाले पाहा व्हिडीओमध्ये!
नवरदेव-नवरीचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 15, 2022 | 11:07 AM

मुंबई : लग्नामधील अनेक खतरनाक व्हिडीओ (Video) नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी नवरदेव-नवरीच्या जेवणाचा व्हिडिओ, कधी लग्नादरम्यानचे मजेशीर क्षण तर कधी ब्युटी पार्लरमधून वधूचा लूक अशा नानाप्रकारचे लग्नाशी संबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. लग्नातील (Wedding) व्हिडीओ युजर्सना बघायला देखील प्रचंड आवडतात. सध्या असाच एक खास लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होताना दिसतो आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्ही देखील पोट धरून हसल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत.

नवरीला पाहून नवरदेवाला आली चक्कर

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की काही लोक खूप भावनिक असतात आणि त्यांच्या भावनांवर त्यांचे अजिबात नियंत्रण देखील नसते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव लग्न मंडपामध्ये उभा आहे. त्याचवेळी नवरीची एन्ट्री होते…आणि काय सांगता…आपल्या होणाऱ्या बायकोला(नवरीला) पाहून नवरदेवाला चक्क चक्करच येते. यावेळी नवरदेवाचे मित्र त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तो नवरीला हात धरून लग्न मंडपामध्ये आणतो.

इथे पाहा नवरदेव-नवरीचा व्हायरल होणारा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by WedAbout.com (@wedabout)

हा व्हायरल होणारा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओमधून नवरदेवाचे आपल्या होणाऱ्या बायकोवरील प्रेम दिसून येते आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर wedabout नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. यासोबतच या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘अरे, नवरदेवाची स्टाईल खूप सुंदर होती.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘नवरदेव खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होता वाटतं आणि आता त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

संबंधित बातम्या : 

शाळेतल्या मुलांचा हा अतरंगी व्हिडिओ पाहिला का? एवढी मस्ती कुणी केली असेल का? Video viral

200 रुपयांची Soda Shikanji? काय आहे challenge? हा Viral video पाहा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें