बहिणीसाठी काय पण! भाऊ बहिणीचं नातं एका व्हिडिओमध्ये

भावा-बहिणीच्या नात्याचं उत्तम वर्णन या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळतं.

बहिणीसाठी काय पण! भाऊ बहिणीचं नातं एका व्हिडिओमध्ये
brother sister love
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 04, 2022 | 3:32 PM

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक भाऊ आपल्या बहिणीला शांत करताना दिसत आहे. बहीण कुठल्या तरी कारणामुळे प्रचंड रडतीये आणि तेव्हा तिचा भाऊ जवळ येऊन तिला समजावतोय असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. भावा-बहिणीच्या नात्याचं उत्तम वर्णन या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळतं.

या व्हिडीओमध्ये एक सात वर्षांचा मुलगा आपल्या रडणाऱ्या मोठ्या बहिणीचं सांत्वन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलगा बहिणीच्या शेजारी उभा आहे.

त्याची बहीण खुर्चीवर बसलेली आहे आणि ती सतत रडत आहे, उदास आहे, तिच्या डोळ्यात अश्रू आहेत. तिचा भाऊ तिच्या जवळ येतो आधी प्रेमाने तिला काहीतरी विचारतो आणि मग जवळ घेतो. तिच्या रडण्याचे कारण मात्र व्हिडीओ पोस्ट करताना सांगितलेलं नाही.

हा व्हिडिओ शेअर करत युझरने म्हटले, बहिणीला अचानक रडताना पाहिले आणि तो सर्व काही सोडून तिच्याकडे तो धावत गेला.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक तो शेअर करत आहेत.