AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘अपनी गली मैं कुत्ता शेर’, पण दुसऱ्याचं गल्लीत गेल्यावर कुत्र्याची काय हालत होते?, पाहा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा दुरुनच कोंबड्यांवर खूप भुंकताना दिसतो, पण जसं त्याला कोंबड्यांच्या खुराड्यात सोडलं जातं, त्याची  हालत खराब होते.

Video:  'अपनी गली मैं कुत्ता शेर', पण दुसऱ्याचं गल्लीत गेल्यावर कुत्र्याची काय हालत होते?, पाहा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ
कुत्रा आणि कोंबड्यांचा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 5:54 PM
Share

‘हर कुत्ता अपनी गली में शेर होता है’, ही हिंदीतली म्हण तुम्ही ऐकली असेल, ही म्हण त्यांच्यासाठी वापरली जाते, सांगून जे लोक फुशारकी मारतात, पण जेव्हा खरं करण्याची वेळ येते, तेव्हा पळ काढतात. ही म्हण फक्त कुत्र्यांवर असली तरी ती माणसांवरही लागू होते. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून तुमचा नक्कीच विश्वास बसेल की, ही म्हण कुत्र्यांवर का लावली जाते. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. (Viral video of Dog was barking on chickens funny video )

व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा दुरुनच कोंबड्यांवर खूप भुंकताना दिसतो, पण जसं त्याला कोंबड्यांच्या खुराड्यात सोडलं जातं, त्याची  हालत खराब होते. त्याला काय करावं सुचत नाही. तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक लोखंडी रेलिंगसारखी भिंत आहे, ज्याच्या पलीकडे कुत्रा आहे आणि दोन कोंबड्या खुराड्यात आहेत. त्या कोंबड्यांना पाहून हा कुत्रा इकडून तिकडे धावतो आणि त्यांच्यावर खूप भुंकतो, पण नंतर एक मुलगी त्याला उचलून पलीकडच्या बाजूला ठेवते, जिथं कोंबड्या राहतात, आता कुत्र्याने कोंबड्यांना आपल्या जवळ पाहिल्यावर त्याची अवस्था वाईट होते

पाहा व्हिडीओ

हा मजेदार व्हिडिओ asupan.reels.hewani नावाने इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 3 मिलियनपेक्षा जास्त म्हणजेच 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 33 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने ‘आता भुंकू नको’ अशी कमेंट केली आहे, तर दुसर्‍या युजरने लिहिले आहे की, ‘उगाच घाबरवण्याचं नाटक करु नका, नाहीतर ते कधीही अंगाशी येतं.’

हेही पाहा:

Video: गुडघाभर पाण्यात सूर मारायला गेला, आणि तोंडावर आपटला, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल!

Video: दबा धरुन बसलेल्या कुत्र्याला बकरीने धू धू धुतलं, व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट!

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.