जिंकला जिंकला! साप नाही, मुंगूस! खतरनाक व्हिडीओ

हा व्हिडिओ रस्त्यावर शूट करण्यात आला असून काही अंतरावर लोकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात आधी हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही पाहा...

जिंकला जिंकला! साप नाही, मुंगूस! खतरनाक व्हिडीओ
snake
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 01, 2022 | 5:16 PM

सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ प्राण्यांच्या लढाईचे, तर काही सापांच्या भांडणाचे व्हिडिओ शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ पाहून लोक चांगलेच आश्चर्यचकित झालेत. या व्हिडीओमध्ये साप आणि मुंगूस एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांना मारायला टपलेले दिसतायत.

साप आणि मुंगूस हे एकमेकांचे शत्रू आहेत हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. याचा सबळ पुरावा हा व्हिडिओ देतो.

हा व्हिडिओ रस्त्यावर शूट करण्यात आला असून काही अंतरावर लोकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात आधी हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही पाहा…

व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये कुणीही माघार घ्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत विजेता कोण, शेवटी ही जीवाची बाजी कोण जिंकणार, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

जरी व्हिडिओच्या सुरुवातीला, मुंगूस हल्ला करताना साप देखील प्रतिहल्ला करताना दिसत असला तरी सापाची बाजू हळूहळू कमकुवत होऊ लागते. अखेर मुंगूस साप तोंडात घेतो आणि जिंकतो!

इतकंच नाही तर हजारो युझर्सनी (सोशल मीडिया यूजर्स) हा व्हिडिओ लाईकही केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. काही जण घाबरले होते, काही जण असा सामना पाहण्यात रमले.