
अनेकदा असे म्हटले जाते की वेळेच्या आधी कोणी जात नाही आणि वेळ आली की कोणी वाचवू शकत नाही… आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा ही गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर खरी ठरते. आता असेच काहीसे घडल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक स्कायडाव्हरने विमानातून तर उडी मारली. पण त्याचे पॅराशूट विमानाच्या एका बाजूच्या पंख्याला अडकले आहे. नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया…
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा ऑस्ट्रेलियामधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार, ११ डिसेंबर रोजी एक थरकाप उडवणारे फुटेज जारी केले, ज्यात हा भयानक प्रसंग कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक स्कायडायव्हर रिझर्व्ह पॅराशूटमुळे विमानाच्या मागच्या भागात अडकला होता. विमान जमिनीपासून सुमारे १५,००० फीट (४,६०० मीटर) उंचीवर होते आणि तिथे एक जीव अडकला होता. मृत्यू दार ठोकायला तयार होता, पण स्कायडायव्हरच्या सजगतेमुळे त्याचा जीव वाचला आहे.
वाचा: लग्न मोडल्यावर स्मृती मानधनाचे अनेक खुलासे, पहिल्यांदाच सगळं सांगितलं; म्हणाली मी दिवस-रात्र….
NEW: Skydiver’s parachute gets caught on the tail of a plane, leaving him dangling 15,000 feet in the air over North Queensland, Australia.
As the parachutist climbed out of the plane, his reserve parachute handle got snagged on a wing flap.
The parachute then deployed and… pic.twitter.com/oVxiOl8bWN
— Collin Rugg (@CollinRugg) December 11, 2025
तो स्कायडायव्हर या घटनेतून सहीसलामत बचावला. ही घटना सप्टेंबर महिन्यातील आहे, पण ऑस्ट्रेलियाच्या परिवहन सुरक्षा निगरानी संस्थेच्या तपासानंतरच हा व्हिडीओ समोर आला आहे. स्कायडायव्हर्स स्टंट करत होते आणि केर्न्सच्या दक्षिणेकडे हा भयंकर अपघात टळला.
हवेत हात जोडून चेन बनवणार होते १६ स्कायडायव्हर्स
स्टंटचा प्लॅन असा होता की १५,००० फीट (४,६०० मीटर) उंचीवर १६ स्कायडायव्हर्स उड्या मारतील आणि पॅराशूट उघडल्यानंतर हातात हात घालून चेन बनवतील (१६-वे फॉर्मेशन). हा संपूर्ण प्रसंग पॅराशूटिंग कॅमेरा ऑपरेटर चित्रित करत होता. पण जसे पहिला स्कायडायव्हर विमानाबाहेर पडला, काही सेकंदातच सगळा प्लॅन कोलमडला. ऑस्ट्रेलियाच्या परिवहन सुरक्षा ब्यूरोने जारी केलेल्या व्हिडीओत दिसते की पहिल्या स्कायडायव्हरचा पाय घसरतो आणि त्याचे रिझर्व्ह पॅराशूट उघडून विमानाच्या विंग फ्लॅपमध्ये अडकते. यामुळे तो स्कायडायव्हर हवेत लटकतो. मृत्यू जवळ आला होता.
पुढे काय झाले?
पण येथे त्या स्कायडायव्हरसाठी दोन चांगल्या गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे त्याच्याकडे अजून त्याचे मुख्य (मेन) पॅराशूट शाबूत होते आणि दुसरी म्हणजे त्याचा मेंदू या परिस्थितीतही सकारात्मक काम करत होता. त्या निर्णायक क्षणी स्कायडायव्हरने आपल्या चाकूने रिझर्व्ह पॅराशूटच्या दोऱ्या कापून टाकल्या आणि स्वतःला मुक्त केले. त्यानंतर त्याने मुख्य पॅराशूट उघडले आणि सुरक्षितपणे जमिनीवर उतरला. या घटनेमुळे विमानाचा मागचा भाग “खूप मोठ्या प्रमाणात” खराब झाला होता आणि पायलटचे विमानावर नियंत्रण राहिले नव्हते. त्याला इमर्जन्सी मेडे कॉलही करावा लागला. पण येथूनही चांगली बातमी आली. विमान सुरक्षितपणे लँड करण्यात आले.