
Brother Sister Viral Photo : कधी कधी पैशांची गरज पडली की आधी तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला किंवा भावंडांना (Siblings) विचारायला जाता, पण त्यांना तुमच्या सवयींची जाणीव असते. कर्जात दिलेले पैसे परत मिळणार की नाही, याची त्यांना कल्पना असते. काही जण पैसे घेऊन काही दिवसांनी मी ते परत देतो, असे सांगतात, पण तसे होत नाही. उधारीवर पैसे घेऊन लोकही गायब होतात. म्हणूनच अनेकदा दुकानांवर लिहिलेलं पाहायला मिळतं की इथे उधारी बंद आहे. जेव्हा उधार दिलेल्या वस्तू परत मिळत नाहीत, तेव्हाच लोकांचा विश्वास उडतो (Trust Issues) आणि पुढच्या वेळेसाठी माणूस सतर्क होतो. असाच काहीसा प्रकार या व्हायरल पेपरमध्ये (Viral Paper) पाहायला मिळाला, जेव्हा एका बहिणीने आपल्या भावाकडे फक्त 2 हजार रुपये रोख कर्ज मागितले होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, एका बहिणीने आपल्या भावाकडे 2000 रुपयांचं कर्ज मागितलं, पण तिचा भाऊ मात्र चलाख निघालाय त्याने चक्क बहिणीला पैसे देण्यापूर्वी स्टॅम्प पेपरवर पुरावा म्हणून लिहिले की, त्याने २,००० रुपयांचे कर्ज दिले आहे आणि ते त्याची बहीण मर्यादित तारखेपर्यंत परत करेल. त्यासाठी त्यांनी केवळ सही करून घेतली नाही तर त्याच्या बहिणीचा अंगठाही घेतलाय. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.
चित्रात आपण पाहू शकता, पहिले म्हणजे निळ्या रंगावरून लिहिलेला स्टॅम्प पेपर. “मिस अयमनला 18 जुलै 2022 रोजी रात्री 8.30 वाजता श्री. कासिमकडून 2,000 रुपये मिळाले. आता ती 15 ऑगस्ट 2022 रोजी श्री. कासिम यांना 2,000 रुपये परत करेल.” यानंतर, रिसीव्हरची सही आणि खाली देणगीदाराची स्वाक्षरी आणि नंतर अंगठा दोन्ही लावण्यात आले आहेत. सध्या लोक सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल करत आहेत.