VIDEO : सोनपापडीऐवजी कंपनीच्या दिवाळी पार्टीत वोडका पाणीपुरी! ऑफिस पार्टीमध्ये उडाली एकच झुंबड

दिवाळीत कर्मचाऱ्यांसोबत आनंद सेलिब्रेट करण्यासाठी अनेक ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी आयोजित केली जाते. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना सोनपापडी देऊन खूश करण्याचा प्रयत्न असतो. तर काही ठिकणी मोठी पार्टी दिली जाते. पण सोशल मीडियावर अशा एका पार्टीची चर्चा होते आहे,ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत

VIDEO : सोनपापडीऐवजी कंपनीच्या दिवाळी पार्टीत वोडका पाणीपुरी! ऑफिस पार्टीमध्ये उडाली एकच झुंबड
VIRAL VIDEO
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 10:44 AM

दिवाळी पार्टी म्हटलं की फराळ,मिठाई, चाट आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असते. कुठे पाणीपुरीचा स्टॉल असतो. तर कुठे शेवपुरी आणि दहीपूरीचा बेत असतो. पण एका कॉर्पोरेट कंपनीने पार्टी अशी काही एन्जॉय केली आहे की सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. कारण इथे साध्या तिखट – गोड पाण्याऐवजी चक्क जामून प्लेवरच्या वोडकाचा वापर करून पाणीपूरीची पार्टी करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीच्या दिवाळी सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळाली.पार्टीत कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यापैकी एका स्टॉलवर वोडका पाणीपूरीचा खास स्टॉल लावण्यात आला होता.

Loading...

व्हिडिओमध्ये शेफ आधी नेहमीप्रमाणे कुरकुरीत पुरीमध्ये बटाट आणि चण्याचं रगडा भरतो. त्यानंतर नेहमीच्या पाणीपुरीच्या पाण्याऐवजी जामून प्लेवरच्या वोडकाचा शॉट त्यात टाकतो. ती पाणीपुरी खाण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी देखील पाहायला मिळते.
त्यामुळे हा प्रकार पाहून पार्टीत असलेले कर्मचारी आश्चर्यचकित देखील झाले आहेत. काही जण आवडीने या पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

 

 

Went to a Diwali party in Delhi and found a pani puri stall serving vodka. India is not for beginners 😭
by
u/Dense_Ad3621 in
IndiaPulse_

साधारणपणे ऑफिसच्या दिवाळी पार्टीत मिठाई, फराळ आणि जेवणाचा बेत असतो. पण या पार्टीत वोडका पाणीपुरीचा पर्याय ठेवल्याने सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीनेही यावेळी कंपनीने सोनपापडीऐवजी काहीतरी वेगळाच खास सरप्राईज दिल्याची मजेशीर टिपप्णी केली.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. एका युजरने एका बाजूला आमची कंपनी सोनपापडी देते आणि दुसरीकडे ही कंपनी पाहा, कर्मचाऱ्यांना वोडका पाजते. तर काही लोकांनी आपल्या कंपनीला टॅग करून पुढच्या दिवाळी पार्टीत असाच मेन्यू ठेवणयाची मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us