दारू प्यायल्यावर लोक इंग्रजी का बोलतात? काय सांगतं संशोधन वाचा

| Updated on: Jan 26, 2023 | 1:30 PM

या संशोधनात दोन भाषांचे ज्ञान असलेल्या 50  जणांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व लोकांना दारू प्यायला देण्यात आली, त्यानंतर दारू पिणारी व्यक्ती...

दारू प्यायल्यावर लोक इंग्रजी का बोलतात? काय सांगतं संशोधन वाचा
alcohol drinking
Image Credit source: Social Media
Follow us on

दारू प्यायल्यानंतर तुम्ही अनेकदा लोकांना मद्यधुंद अवस्थेत वेगवेगळ्या प्रकारचं नाटक करताना पाहिलं असेल. काही लोक नशेच्या अवस्थेत अधिक भावूक होतात, तर काही लोक आपल्या मनातलं सर्व सांगतात. असेही म्हटले जाते की मद्यधुंद लोक नेहमीच खरे बोलतात, परंतु हे मद्यपी लोक केवळ खरंच बोलत नाहीत तर इंग्रजीदेखील बोलतात हे आपण कधी पाहिले आहे का?

अनेकदा मद्यपींचे इंग्रजी ऐकून हसू आवरता येत नाही. नशेच्या अवस्थेत माणसाच्या आतील भाषेविषयीची भीती खूपच कमी होते, त्याबरोबरच तो ‘लोक काय विचार करतील’ यातूनही बाहेर पडतो. हेच कारण आहे की कोणतीही मद्यपी व्यक्ती सहजपणे वेगवेगळ्या भाषा बोलू लागते.

लिव्हरपूल युनिव्हर्सिटी आणि किंग्ज कॉलेज लंडन मध्ये सेकंड लँग्वेज आणि अल्कोहोलच्या संबंधाबद्दल एक संशोधन करण्यात आले होते, ज्यामध्ये हे खरे असल्याचे सिद्ध झाले आहे.

या संशोधनात दोन भाषांचे ज्ञान असलेल्या 50  जणांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व लोकांना दारू प्यायला देण्यात आली, त्यानंतर दारू पिणारी व्यक्ती दुसरी भाषा आणखी चांगली बोलत होती, तर दारू पिण्यापूर्वी ते तसे करत नव्हते.

या संशोधनानंतर संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, थोडीशी अल्कोहोल तुमचा उच्चार सुधारते. त्याचबरोबर यामुळे तुमच्या आतील अस्वस्थताही कमी होते. तर जास्त मद्यपान करणारी व्यक्ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नसते. मात्र, हाही अंतिम निकाल मानला गेलेला नाही. शास्त्रज्ञांच्या मते, या विषयावर अधिक संशोधन केल्यानंतरच अंतिम निकाल दिला जाऊ शकतो.