Donkey Milk: IT ची नोकरी सोडून एकाने डॉंकी फार्म सुरु केलं, गाढविणीच्या दुधाला इतकं महत्त्व का?

| Updated on: Oct 04, 2022 | 5:31 PM

नुकतंच एका 42 वर्षीय व्यक्तीने सॉफ्टवेअर कंपनीतील आयटीची नोकरी सोडून दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका गावात डॉंकी फॉर्म सुरू केलाय.

Donkey Milk: IT ची नोकरी सोडून एकाने डॉंकी फार्म सुरु केलं, गाढविणीच्या दुधाला इतकं महत्त्व का?
Donkey Milk
Image Credit source: Social Media
Follow us on

गाढवाचे दूध ऐकायला तुम्हाला नवीन वाटू शकतं पण ते हजारो वर्षांपासून आहे. या दुधाने अलीकडेच लोकप्रियता मिळविलीये, विशेषत: युरोपच्या काही भागात.

गाढवाचं दूध नैसर्गिक आणि निरोगी असतं. नुकतंच एका 42 वर्षीय व्यक्तीने सॉफ्टवेअर कंपनीतील आयटीची नोकरी सोडून दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका गावात डॉंकी फॉर्म सुरू केलाय.

कर्नाटकात काम सोडण्याचा आणि एक अनोखा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी या व्यक्तीने 2022 पर्यंत सॉफ्टवेअर कंपनीत काम केलंय.

गाढवाच्या दुधाला औषध आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठा इतिहास आहे. आधीच्या काळात या दुधाचा वापर संधिवात, खोकला आणि जखमांवर उपचार करण्यासाठी केला जायचा.

क्लिओपात्राने गाढवाच्या दुधात स्नान करून आपली त्वचा मुलायम आणि गुळगुळीत ठेवली होती, असेही म्हणतात.

एक लिटर गाढविणीच्या दुधाचा भाव 13 हजार रुपयांच्या आसपास आहे. यात अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत. हे लोक औषधांमध्ये आफ्रिका आणि भारताच्या काही भागात खोकला आणि विषाणूंसह संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

गाय, बकरी, मेंढी, म्हैस आणि उंट अशा इतर दुग्धजन्य प्राण्यांच्या दुधाच्या तुलनेत गाढवाचं दूध हे मानवी आईच्या दुधासारखंच असतं.

19 व्या शतकात प्रथमच अनाथ मुलांना फिडींगसाठी याचा वापर करण्यात आला. यात जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच प्रथिने दोन्ही असतात आणि त्यात चरबी कमी असते.