Wedding Couple : मधुचंद्राच्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी का सजवतात? 99 टक्के लोकांना खरं कारण नाही माहित

लग्न झालेल्या नवीन जोडप्याची खोली सजवण्याची प्रथा काही लोक पाळतात. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. पण अशी फुलांची सजावट का केली जाते? या बद्दल फार कमी जणांना माहित असेल.

Wedding Couple : मधुचंद्राच्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी का सजवतात? 99 टक्के लोकांना खरं कारण नाही माहित
wedding Decoration
Image Credit source: pinterest
| Updated on: Feb 16, 2023 | 10:35 AM

Wedding Couple : हिंदू धर्मात लग्नाच एक वेगळं महत्त्व आहे. विवाहाला पवित्र बंधन मानलं जातं. तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल, लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. त्याशिवाय खोलीस सुंगध दरवळत रहावा, यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अत्तर वापरली जातात. लोक सजावटीसाठी खास आपल्या पसंतीच्या फुलांची निवड करतात. लग्न झालेल्या नवीन जोडप्याची खोली सजवण्याची प्रथा काही लोक पाळतात. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीची खोली फुलांनी सजवली जाते. पण अशी फुलांची सजावट का केली जाते? या बद्दल फार कमी जणांना माहित असेल. आज आम्ही यामागची कारणं तुम्हाला सांगणार आहोत.

फुलांची सजावट करण्यामागे कारणं काय?

लग्नानंतर पहिल्या रात्री खोली सजवण्यामागे वेगवेगळी कारणं सांगितली जातात. लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीमध्ये फुलांची सजावट केल्यास, नवरा-नवरीच आयुष्य फुलांसारख सुगंधी रहात, असा एक समज आहे. नव्या जीवनाची सुरुवात फुलांसारखी सुंदर होते. वधूचा घरातला पहिलाच दिवसत असतो. त्यावेळी रुममधील वातावरण रोमँटिक बनवण्यासाठी फुलांची सजावट केली जाते. अनेक जण रुममध्ये फुलांसह मिठाई सुद्धा ठेवतात. असं केल्याने नवरा-नवरीच्या आयुष्यात गोडवा येतो, असं काही जणांच मत आहे. वैज्ञानिक अंगाने बोलायच झाल्यास, फुल आणि त्यांच्या सुगंधामुळे कामेच्छा अधिक उत्कंट होते. म्हणून खोलीची फुलांनी सजावट केली जाते.

सजावटीसाठी कुठली फुलं वापरावीत?

लग्नाच्या पहिल्या रात्री खोली सजवण्यासाठी अनेकजण गुलाबांच्या फुलाचा वापर करतात. त्याशिवाय अत्तराची फवारणी केली जाते. रुमचा लूक रोमँटिक करण्यासाठी मेणबत्त्यांचाही वापर केला जातो. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी फुल वापरली जातात. नवरा-नवरीच पुढचं आयुष्य सुंदर व्हाव, त्याचबरोबर लग्नाची पहिली रात्र अधिक रोमँटिक व्हावी, हा फुलांच्या सजावटीमागे उद्देश असतो.