साडी नेसून “हुप्पा हुय्या!” सुनेसोबत वेट लिफ्टिंग, 56 वर्षीय महिलेचं Gym Workout

खरंतर ही 56 वर्षीय महिला जिममध्ये साडी नेसून घाम गाळत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांना धक्काच बसला.

साडी नेसून हुप्पा हुय्या! सुनेसोबत वेट लिफ्टिंग, 56 वर्षीय महिलेचं Gym Workout
At the age of 56
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 20, 2022 | 1:22 PM

जेव्हा लोकांचं वय वाढतं तेव्हा त्यानुसार लोक आपल्या शरीराची काळजी घेतात. अनेक जण डाएटकडे लक्ष देतात, तर अनेकजण जिममध्ये जाऊन घाम गाळतात. वाढत्या वयात चांगल्या सवयींचा अवलंब करणे अधिक आवश्यक ठरते, ज्यामुळे तुम्ही मजबूत आणि सक्रिय राहता. नुकताच चेन्नईतील एका 56 वर्षीय महिलेचा जिममधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

खरंतर ही 56 वर्षीय महिला जिममध्ये साडी नेसून घाम गाळत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांना धक्काच बसला.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ही महिला जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. साडी नेसून ती वजनदार डंबेल्स आणि इतर अनेक जिम मशीन्स आणि उपकरणे उचलताना दिसतीये.

सगळ्यात हटके गोष्ट म्हणजे ही महिला आपल्या सुनेसोबत वर्कआऊट करत आहे. व्हिडिओच्या शेवटी जिममधील इतर महिलांसोबत स्टाफ मेंबर्सकडूनही या महिलेचा सत्कार करण्यात येतो.

मी आणि माझी सून नियमित व्यायाम करतो, असं या महिलेचं म्हणणं आहे. मी पहिल्यांदा जिममध्ये जायला सुरुवात केली तेव्हा मी ५२ वर्षांची होते.

मला गुडघे आणि पायात प्रचंड वेदना होत असल्याचं कळल्यावर हे सगळं सुरू झालं, असंही या महिलेनं सांगितलं. माझ्या मुलाने उपचारांबद्दल बरेच संशोधन केले आणि मला व्यायाम करण्याची सूचना केली.

सध्या मी माझ्या सुनेबरोबर पॉवरलिफ्टिंग आणि बैटिंग करते, त्यामुळे माझं दुखणं दूर झालं. साडी नेसून जिम करायला आवडतं, असंही ती म्हणाली.