शुगर डॅडी! 67 वर्षाच्या पुरुषाच्या प्रेमात पडली तरुण मुलगी, काय होतं असं पाहा…

| Updated on: Sep 10, 2022 | 3:44 PM

ज्यावेळी जेम्स पार्करला डेमिया एकटीच राहते असं समजलं त्यावेळी मात्र त्याने तिच्यासाठी घर खरेदी केलं आणि ती दोघं एकत्र राहू लागली. 2017 साली सुरू झालेल्या त्यांच्या नातेसंबंधाला जेम्सने तिच्यासाठी घर घेतल्यानंतर मात्र ती दोघं कायमच एकत्र आली.

शुगर डॅडी! 67 वर्षाच्या पुरुषाच्या प्रेमात पडली तरुण मुलगी, काय होतं असं पाहा...
Follow us on

मुंबईः आपल्या वयाच्या मुलांची वेगवेगळी नाटकं बघून एका महिलेने फेसबुकवर पोस्ट लिहित आपल्या भावना तिने शेअर केल्या आहेत. तिने लिहिले आहे की, 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना डेट करायचे आहे असं तिनं म्हटलं आहे. हे लिहित असताना त्या महिलेने त्या पोस्टमध्ये एक अट ठेवली आहे की, डेट (Dating) करणारे पुरुष हे श्रीमंत पाहिजे, कारण तिला आर्थिक मदत मिळेल. सोशल मीडियावर (Social Media) ही पोस्ट व्हायरल ( Viral Post) होताच तिला एक साथीदारही मिळाला आहे.

डेट करु पाहणाऱ्या महिलेला मिळालेल्या साथीदाराने तिच्यासाठी 3 कोटीचे घर आणि जवळ जवळ 37 लाखाची कार तिला भेट म्हणून दिली आहे. यानंतर मात्र ती दोघं आता प्रेमात असल्याचे सांगण्यात येत आहे.

वयाने मोठा हवा

ज्या व्यक्तीला महिला डेट करते आहे, तो तिचा साथीदार 36 वर्षापेक्षाही मोठा असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोघांनीही आता लग्न केल्याचेही सांगितले जात आहे.

फेसबूक पोस्टनंतर दोघं प्रेमात

डेमिया विलियम्स आणि जेम्स पार्कर ही दोघं 2017 पासून प्रेमात असल्याचे सांगतात. 31 वर्षाची असणारी डेमियाने फेसबूक पोस्ट लिहिल्यानंतर जेम्स पार्करने तिला मेसेज केला होता. आणि त्यानंतर ही दोघं एकत्र आली होती.

त्याचवेळी डेमियाने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले होते, की मला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी म्हणून मी 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला मी डेट करु इच्छिते.

माझ्या समवयस्क मुलांची नाटकं

डेमियाने डेटिंगबाबत लिहिताना हे ही लिहिले होते की, माझ्या वयाच्या मुलांची नाटकं बघून मला आता त्यांना कंटाळली आहे. त्यावेळी जेम्स 62 वर्षाचे होते, आणि ते नोकरीवरुन निवृत्तही झाले होते. त्याचवेळी जेम्स पार्करचा घटस्फोटही झाला होता, त्यानंतरच या दोघांनी चर्चा करुन एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.

तिच्यासाठी खरेदी केली कार

ज्यावेळी डेमियाची कार चोरीला गेली त्यावेळी जेम्स पार्करने तिच्यासाठी 37 लाखाची कार खरेदी केली आणि तिला भेट दिली. त्यानंतर मात्र ती दोघं नेहमी बाहेर फिरायला जात होते.

घरामुळे आले एकत्र

ज्यावेळी जेम्स पार्करला डेमिया एकटीच राहते असं समजलं त्यावेळी मात्र त्याने तिच्यासाठी घर खरेदी केलं आणि ती दोघं एकत्र राहू लागली. 2017 साली सुरू झालेल्या त्यांच्या नातेसंबंधाला जेम्सने तिच्यासाठी घर घेतल्यानंतर मात्र ती दोघं कायमच एकत्र आली.