Santosh Bangar : संतोष बांगर यांच्याकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले, …मला फरक पडत नाही
मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपांवर संतोष बांगर पहिल्यांदा बोलले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना बांगर म्हणाले की, "मला कितीही तुटून पडले तरी फरक पडत नाही. मी माझे कर्तव्य बजावले. त्या ठिकाणी एका महिलेचे मतदान झाले नव्हते, मी माझा नंबर लागल्यावर तिला मतदान झाले असे सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी टीव्ही ९ शी बोलताना संतोष बांगर म्हणाले की, “कितीही तुटून पडले तरी मला फरक पडत नाही,” असे संतोष बांगर यांनी स्पष्टपणे सांगितले. मतदानाच्या वेळेला झालेल्या कथित गोपनीयतेच्या भंगावर त्यांनी आपले मत मांडले. आमदार संतोष बांगर म्हणाले की, मी माझे कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेलो होतो. त्यावेळी एका महिलेचे मतदान झाले नव्हते. माझा नंबर लागल्यावर, मी फक्त तिला “मतदान झाले” असे सांगितले. यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. केवळ “मतदान झाले, बाहेर जा,” असे म्हणणे हा गुन्हा ठरू शकत नाही, असे आमदार संतोष बांगर यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

