Bhaskar Jadhav : सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा… सदस्यसंख्येच्या अटीवरून भास्कर जाधव यांचा सरकारवर हल्लाबोल, खुर्चीसाठी कोण काय करतं…
नागपूर हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांनी १०% सदस्यसंख्येच्या अटीवरून सरकारवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेतेपदासाठी ही अट कायद्यात नाही असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच सचिवांने दिलेल्या पत्राचे वाचन करण्याचा सल्ला दिला. सत्तेसाठी काय केले जाते हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितल्याचा दावाही जाधव यांनी केला.
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी १०% सदस्यसंख्येच्या अटीवर राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ही अट घटनेत किंवा कायद्यात कुठेही नसल्याचे ते म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच विधिमंडळाच्या सचिवांनी दिलेल्या लेखी पत्राचे वाचन करण्याचा सल्ला आमदार भास्कर जाधव यांनी दिला. सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “खुर्चीसाठी कोण काय करतो हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले आहे,” असे आमदार भास्कर जाधव म्हणाले. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार कसे पाडले, याचेही त्यांनी स्मरण करून दिले. सरकार सत्तालोभी असल्याचा आरोप करत, देताना सदस्यसंख्या आठवणारे घेताना मात्र ती विसरतात, असेही आमदार भास्कर जाधव यांनी नमूद केले.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?

