Dhoom Style Robbery : हायवेवरचे लुटेरे… बीडमध्ये दहशत, लुटीचे ‘ते’ 10 स्पॉट अन् लुटीचे 10 नवे पॅटर्न कोणते?
बीड-गेवराई आणि धुळे-सोलापूर महामार्ग लुटारूंचा अड्डा बनला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या धूम स्टाईल लुटीच्या घटनांसह अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. कृत्रिम अपघात घडवून, खिळे टाकून, किंवा धावत्या वाहनांतून वस्तू हिसकावून लूटमार केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत संवेदनशील ठिकाणांची यादी जाहीर केली आहे.
बीड-गेवराई मार्गासह धुळे-सोलापूर महामार्ग सध्या लुटारूंचा अड्डा बनला आहे. या मार्गांवर धूम स्टाईलने घडणाऱ्या लुटीच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते, ज्यात दोन दुचाकीस्वारांनी धावत्या व्होल्व्हो बसमधून साहित्य फेकले आणि त्याचे साथीदार ते उचलून फरार झाले. दोन दिवसांपूर्वी गेवराईजवळ तेलंगणाहून शिर्डीला जाणाऱ्या एका कुटुंबाची गाडी अडवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून लूटमार करण्यात आली होती. वाढत्या घटनांमुळे खुद्द पोलिसांनीच लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कृत्रिम अपघात दाखवून, रस्त्यावर खिळे टाकून, दुचाकीस्वारांना पाडून किंवा धावत्या वाहनांतून सोनसाखळी हिसकावून घेण्यासारखे लुटीचे सात पॅटर्न पोलिसांनी सांगितले आहेत. महामार्ग पोलीस आणि जिल्हा पोलीस रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असून, लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहेत.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?

