Video | मासे पकडणे म्हणजे सगळ्यात कंटाळवाणं काम, पण या महिलेचं टॅलेंट पाहा

Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला आपल्या हाताने मासे पकडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

Video | मासे पकडणे म्हणजे सगळ्यात कंटाळवाणं काम, पण या महिलेचं टॅलेंट पाहा
Amazing Viral Video (4)
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 19, 2023 | 7:46 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Amazing Viral Video) रोज नवे चांगले व्हिडीओ पाहायला मिळतात. नेटकऱ्यांना असे व्हिडीओ (Viral Video) पाहायला कायम आवडतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लोकांचं लक्ष खेचत आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का देखील बसला आहे. अधिकतर नेटकरी हा व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत पाहणं पसंत करतात. सध्या एक चांगलाचं व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी आपल्या हाताने मासे (fish catching) पकडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकं नव्या पद्धतीने मासे पकडतात

देशात मासे पकडण्यासाठी लोकं नदी, तलाव, समुद्र अशा ठिकाणी पाहायला मिळतात. काही लोकं फक्त नदी आणि तलाव परिसरात दिसतात, कारण तिथले मासे खाण्यासाठी अधिक चांगले असतात. मासे पकडण्याचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फंडे आहेत. काही ठिकाणी अजूनही पारंपारिक पध्दतीने मासे पकडले जातात. त्याचबरोबर काही ठिकाणी लोकं नव्या पद्धतीने मासे पकडतात. मासे पकडण्याचं अनेकांकडे वेगळं कौशल्य आहे.

महिलेने हाताने मासा पकडला

व्हिडीओमध्ये लोकं कशा पद्धतीने मासे पकडत आहेत, हे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी एक मासा पाण्यात पोहत असताना महिलेला दिसतो. त्यानंतर ती महिला त्या माशाचा अंदाज घेऊन त्याला पकडते. हा मासा तलावात पकडला आहे. ज्यावेळी ती महिला त्या माशाला पकडते, त्यावेळी ती महिला त्या माशाला घट्ट पकडून बाहेर घेऊन जात आहे. महिला ज्या पद्धतीने मासे पकडतं आहे हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण अशा पद्धतीने मासे पकडणे सगळ्यांना शक्य नाही.

व्हिडीओला 3 मिलियन व्यूज मिळाले

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती pet_travel_eat नावाच्या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ७३ लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर ३२ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला देखील आहे. महिलेच्या हिमतीचं सगळ्यांनी कौतुक देखील केलं आहे. त्या व्हिडीओला चांगल्या कमेंट देखील येत आहेत.