तुम्हाला माहिती आहे काय Twitter च्या ‘या’ निळ्या पक्ष्याचे नाव? ट्विटर आणि या पक्ष्याचं आहे अनोखं नातं!

ट्विटरचा लोगो आपण सगळ्यांनीच पहिला आहे. यामधल्या निळ्या रंगाच्या पक्ष्याचे नाव तुम्हाला माहिती आहे काय?

तुम्हाला माहिती आहे काय Twitter च्या या निळ्या पक्ष्याचे नाव? ट्विटर आणि या पक्ष्याचं आहे अनोखं नातं!
ट्विटर लोगो
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 17, 2022 | 12:43 PM

मुंबई, 2006 मध्ये सुरू झालेले ट्विटर सर्वसामान्यांपासून ते मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत मोठ्या प्रमाणात वापरले हात आहे. twitter चे नाव आणि लोगो (twitter Logo) आपण नेहमीच पाहतो. त्यामध्ये असलेला निळ्या रंगाचा पक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो.   परंतु खूप कमी जणांना या पक्ष्याबद्दल माहिती आहे (Twitter Bird Name). हा पक्षी आता  ट्विटर लोगो पक्षी म्हणून देखील ओळखला जातो, मात्र तुम्हाला त्याचे नाव माहित आहे का? त्याचे नाव ‘लॅरी टी बर्ड’ आहे. जाणून घेऊया की या पक्ष्याचा आणि ट्विटरचा काय संबंध आहे.

म्हणून वापरला जातो ‘हा’ पक्षी

ट्विटरच्या पक्ष्याच्या नावामागे एक गोष्ट आहे. ट्विटरच्या या पक्ष्याला प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू लॅरी बर्डचे नाव देण्यात आले आहे. ट्विटरचे सह-संस्थापक बीज स्टोन बोस्टनचे मूळ रहिवासी होते. लॅरी बर्ड सीड स्टोनच्या एनबीए संघ बोस्टन सेल्टिक्ससाठी बास्केटबॉल खेळत असे. बिझ स्टोन हा लॅरी बर्डचा मोठा चाहता होता. अशा परिस्थितीत ट्विटरच्या या पक्ष्याला लॅरी बर्डचे नाव देण्यात आले आहे.

Twitter एक लाऊड ​​स्पेस प्लॅटफॉर्म आहे  इथे लोक ट्विट करून स्वतःचे मत व्यक्त करतात. एकमेकांवर आरोप करतात.  असे असले तरी हा पक्षी शांततेचे प्रतीक मानल्या जातो.

 

ट्विटर हे नाव का ठेवले?

सुरुवातीला अनेक नावांचा विचार झाला पण चारही संस्थापकांचे एकाही नावावर एकमत होऊ शकले नाही. मग त्यांना ट्विटर हा शब्द सापडला. याचा अर्थ पक्ष्याचा किलबिलाट असा होता. आणखी एक अर्थ  म्हणजे माहितीचा भडिमार. हे नाव या प्लॅटफॉमला साजेसे होते. सर्वांचे यावर एकमत झाले आणि ट्विटर या नावाने वेबसाईटचं बारसं करण्यात आलं.

 

कोणी बनविला लोगो

ट्विटरचा मूळ लोगो सायमन ऑक्सले यांनी तयार केला होता. जे त्याने iStock वेबसाइटवर विकण्याची ऑफर दिली. हा लोगो ट्विटरने $15 मध्ये विकत घेतला होता.