Horoscope Today 17 December 2025 : धावपळ, कमी आराम.. या राशीच्या लोकांची आज उडणार गडबड, बुधवारी या राशीच्या लोकांना आर्थिक निश्चिंती
Horoscope Today 17 December 2025, Wednesday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 17 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
व्यवसाय करणाऱ्यांनी आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी इतरांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या योजनांमध्ये शेवटच्या क्षणी बदल देखील होऊ शकता. घरात जोडीदाराशी वाजू शकतं, रात्री बाहेर जेवायला जा, संवादाने प्रॉब्लेम्स सुटतील.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
आज तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. कपड्याच्या व्यवसायात असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या व्यवसायाचा नफा दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं. आर्थिक स्थिती सुधारल्याने निश्चिंत वाटेल.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
आज तुमचे मित्राशी मतभेद होऊ शकतात. इतरांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता खात्री करून घ्या मगच निर्णय घ्या. महिलांना आज अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही नवीन जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्यासारखा चांगला दिवस नाही.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
आज, अचानक पैसे मिळतील, ज्यामुळे आर्थिक गुंतवणूक वाढेल, परिस्थिती चांगली राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल. तुम्ही त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल, ज्यामुळे त्यांना खरोखर बरं वाटेल.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
या राशीच्या व्यवसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल, कारण व्यवसायातील व्यवहार तुमच्या बाजूने होतील. आज एखादा जवळचा मित्र अचानक तुमच्या घरी येऊ शकतो. तुम्ही एकत्र फिरायला जाण्याचा प्लान आखू शकता, समाधान वाटेल.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. या राशीच्या बेरोजगार लोकांना चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून कामात अडचणी येत असतील तर आज सुटका होईल. कामानिमित्त केलेला प्रवास थकवेल, आरामाची गरज भासेल.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
आज कोणतंही पाऊल काळजीपूर्वक उचला, विचार करून निर्णय घ्या. निर्णय घेतानाता हृदयापेक्षा डोक्याचा जास्त वापर करा. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांची बदली अशा ठिकाणी होईल जिथे प्रवास करणे सोपे होईल.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
या राशीखाली जन्मलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हा दिवस नातेवाईकांसोबतच्या नातेसंबंधांना ताजेतवाने करण्याचा देखील आहे. प्रेमाच्या जोडीदारांचा आजचा दिवस रोमँटिक असण्याची शक्यता आहे. ऑफीसमध्ये मशीन बिघडल्याने काम वाढू शकतं.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
आज केलेल्या गुंतवणुकीमुळे तुमच्या समृद्धी आणि आर्थिक परिस्थितीला फायदा होईल. काही गोष्टींमुळे तुमच्या कामाच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. संयमाने, धीराने वागा. प्रश्न नक्की सुटतील. भविष्यात त्रासदायक ठरतील अशा लोकांशी जास्त संपर्क ठेवणं टाळा.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्याच्यावर तुम्ही नेहमीच विश्वास ठेवला होता तो खरोखर विश्वासार्ह नाही हे जाणून तुम्हाला खूप दुःख होईल. याव्यतिरिक्त, सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
जर तुमच्या मुलाने परीक्षेत चांगली कामगिरी केली नाही, तर त्यांना फटकारू नका, तर पुढच्या वेळी त्यांना चांगले काम करण्यास प्रोत्साहित करा. मित्र आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवणे देखील शक्य आहे. कमी आराम मिळेल, धावपळ होईल.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले ऑफिसमधील काम आज पूर्ण होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना हा दिवस चांगला जाईल; ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. त्यांना मित्रांसोबत मनोरंजक खेळ खेळण्याचा आनंदही मिळेल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
