Heavy Rain Alert : 17 ते 20 डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, थेट अलर्ट जारी, राज्यात..
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाकडून नुकताच मोठा इशारा जारी करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पाऊस आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे थंडीचा कडाका बघायला मिळत असल्याने राज्यातही थंडी आहे. पुढील काही दिवसांपासून तापमानात चढउतार बघायला मिळतील. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी कमी झाल्याने थंडीची लाट गायब आहे. मात्र, गारठा आहे. सध्या वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून हवा खराब झाली आहे. सर्दी, ताप आणि गळ्यात खवखव होण्याचा त्रास वाढला असून रूग्णांची संख्या वाढत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुंबईसह पुण्यातही हवा खराब आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. देशातील काही भागात थंडी आहे तर काही भागात पाऊस सुरू आहे.
पुण्यातील हवेचे गुणवत्ता खालावतेय. जीआरएपी केवळ कागदावरच आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने मध्यम ते खराब श्रेणीत नोंदवला जात आहे, असे असतानाही महापालिकेकडून ब्रँडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन अंतर्गत आवश्यक उपाययोजना राबवल्या जात नसल्याने पर्यावरण तज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 6.5 अंश सेल्सिअस तापमान होते. परभणी येथे 7.2 तापमानाची नोंद झाली. जेऊर येथे 7.5 तापमान नोंदवले गेले. नागपूर, भंडारा, पुणे, मालेगाव, यवतमाळ, भंडारा येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातही थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र आहे.
या वर्षी मान्सूनच्या हंगामात देशभरात मुसळधार पाऊस झाला. अजूनही काही राज्यांमध्ये पाऊस कायम आहे. भारतीय हवामान विभागाने 17 ते 20 डिसेंबर या कालावधीत देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने उत्तराखंड,केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पुद्दुचेरी याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
