पुन्हा मुसळधार पाऊस, या 4 राज्यात अलर्ट जारी, थेट इशारा, भारतीय हवामान विभागाने…
Maharashtra Weather Update : राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी कडाक्याची थंडी अशी परिस्थिती आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी कमी झाल्याने राज्यात थंडीचा कडाका कमी झाल्याचे बघायला मिळत आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी बघायला मिळाली. उत्तरेकडे गारठा वाढल्याने थंडी वाढली होती. मात्र, आता थंडी कमी होताना दिसत आहे. गारठा कायम असणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी कमी झाल्याने राज्यातील गारठा कमी झाला. डिसेंबर महिन्यापर्यंत थंडी कायम असणार आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मुंबईत वायू प्रदूषण प्रचंड वाढले. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. सर्दी, गळ्यात त्रास आणि तापीच्या रूग्णांमध्ये सध्या झपाट्याने वाढ होत आहे. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. डॉक्टरही नागरिकांना शक्यतो मास्क घालूनच फिरण्याचा सल्ला देत आहेत. मुंबईतही सकाळच्या वेळी थंडी जाणवत आहे.
पुण्यात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार आहे. शहर आणि परिसरात किमान तापमानात होत असलेली घट कायम आहे. गेल्या आठवड्यापासून किमान तापमानात 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकर अक्षरशः गारठून गेले आहेत. पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
राज्यात जेऊरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळे येथे 6.2 अंश सेल्सिअस तापमान होते. परभणी 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव, नाशिक, गोदिंया, भंडारा यवतमाळ येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आहिल्यानगर येथे 9 अंशांपेक्षा तापमान होते. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात सातत्याने चढउतार होताना दिसेल. विदर्भातही मागील काही दिवसांपासून गारठा वाढत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 16 डिसेंबर रोजी तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, पुद्दुचेरी, हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल. बिहार, पाटणा, भागलपूर आणि दरभंगासाठी दाट धुक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. 16 डिसेंबर रोजी दिल्लीतील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. प्रदूषणाची पातळी आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे. मध्यम ते दाट धुक्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो.
मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरात हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत दिवसाचं तापमान जास्त असेल. त्या तुलनेने सकाळी आणि रात्री थंडी कायम राहील. उंच भागात धुकं पडण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक थंड भाग हा विदर्भात राहण्याची शक्यता आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांमध्ये तुलनेने किमान तापमानात मोठी घट होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.
रस्त्यावरील धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने टँकरच्या माध्यमातून पाणी फवारले असून गेल्या दोन महिन्यांत 67.83 टन धूळ यंत्राच्या साहाय्याने झाडली आहे. 1954 बांधकाम साईट्स सुरू असून 1020 साईट्सवर लो कॉस्ट सेन्सर बसवण्यात आले आहेत. 397 सेन्सर बसवण्याचे काम सुरू आहे. धुळीने प्रदूषण वाढू नये म्हणून पालिकेने 106 टँकरच्या साहाय्याने गेल्या दोन महिन्यांत मुंबईच्या 24 वॉर्डमधील 1518.35 किमी रस्त्यांवर पाणी शिंपडले आहे.
