AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PNG कनेक्शन घेतले? कसे सरेंडर करणार LPG सिलेंडर, प्रक्रिया काय?

LPG Cylinder Connection: देशात गॅस तुटवड्यामुळे नागरिकच नाही तर अनेक उद्योग, हॉटेल चालक हैराण झाले आहेत. याचदरम्यान केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरगुती गॅस पुरवठाच्या नियमात मोठा बदल केला आहे. पाईप्ड नॅचरल गॅस कनेक्शनसाठी एलपीजी गॅस सरेंडर करावा लागेल, काय आहे ती प्रक्रिया?

PNG कनेक्शन घेतले? कसे सरेंडर करणार LPG सिलेंडर, प्रक्रिया काय?
एलपीजी, सीएनजी कनेक्शनImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 17, 2026 | 3:09 PM
Share

PNG Cylinder Connection: देशात गॅस सिलेंडरसाठी सामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. देशात मुबलक साठा असल्याचा सरकारचा दावा असला तरी गॅस एजन्सीबाहेरील गर्दी काही कमी होताना दिसत नाही. गॅसच्या पुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तर काही लोकांकडे PNG आणि LPG गॅस कनेक्शन आहेत. जर एखाद्या दोन्ही गॅस कनेक्शन असतील तर अशा ग्राहकांना एलपीजी कनेक्शन परत करावा लागेल. नाही तर त्यांना सिलेंडर रीफिल करण्याची सुविधा मिळणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी सिलेंडर सरेंडर करण्याची अशी आहे प्रक्रिया.

नियम सांगतो काय?

नवीन नियमातंर्गत ज्या घरात पीएनजी कनेक्शन आहे. तिथे स्वतंत्र एलपीजी कनेक्शन देता येणार नाही. ज्या ग्राहकांकडे दोन्ही गॅसचे कनेक्शन आहेत, त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर सरेंडर करावे लागेल, असा आदेश लागू करण्यात आला आहे. सरकारने सरकारी तेल वितरण कंपन्या आणि वितरकांना सुद्धा याविषयीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ज्या ग्राहकांनी एलपीजी गॅस सिलेंडर सरेंडर केलेले नाही, त्यांना रिफिल देण्यात येणार नाही. जागतिक ऊर्जा संकटांच्या काळात आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर आणि वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. देशात गॅस सिलेंडरची उपलब्धता आणि संतुलन ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

एलपीजी सिलेंडर असे करा सरेंडर

जर घरात पीएनजी कनेक्शन आहे आणि एलपीजी कनेक्शन असेल तर LPG सिलेंडर सरेंडर करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस वितरकाकडे जावे लागेल. तिथे गॅस सिलेंडर जोडणी बंद करण्याचा अर्ज भरून द्यावा लागेल. गॅस पासबुक अथवा ग्राहक क्रमांक जमा करावा लागेल. त्यानंतर सिलेंडर आणि रेग्युलेटर एजन्सीकडे जमा करावे लागेल. हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनीकडून जमा करण्यात आल्यानंतर जी सुरक्षा ठेव ग्राहकाकडून जमा करण्यात आली आहे, ती रक्कम त्याला परत करण्यात येईल.

तर या ऑफलाईन प्रक्रियेसारखीच ऑनलाईन पद्धतीने पण एलपीजी कनेक्शन सरेंडर करता येईल. त्यासाठी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत साईट अथवा मोबाईल ॲपवर लॉगिन करून प्रक्रिया पूर्ण करता येईल. या ठिकाणी सरेंडर कनेक्शन अथवा मॅनेज कनेक्शन सेक्शनमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर वितरकाकडून, गॅस एजन्सीचे कर्मचारी घरी येऊन गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटर घेऊन जातो.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...