Redmi Note 15 5G स्मार्टफोन ‘या’ पॉवरफुल प्रोसेसरसह भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख
रेडमी नोट 15 5जी लवकरच भारतात लाँच होणार आहे, परंतु लाँच होण्यापूर्वी कंपनीने या रेडमी फोनमध्ये प्रोसेसरच नाही तर फोनची बॅटरी आणि जलद चार्जिंग डिटेल्स देखील कंफर्म झाले आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्मार्टफोनचे फिचर्स व किंमत जाणून घेऊयात.

रेडमी नोट 15 5 जी हा स्मार्टफोन काही जागतिक बाजारपेठांमध्ये Redmi Note 15 Pro+ 5G आणि Note 15 Pro 5G सोबत लाँच करण्यात आला आहे. आता कंपनी भारतातील ग्राहकांसाठी Redmi Note 15 5G लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वी या आगामी रेडमी फोनचे फिचर्स हळूहळू कंफर्म केली जात आहेत. या आगामी रेडमी फोनसाठी अमेझॉनवर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की लॉन्च झाल्यानंतर हा फोन कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Redmi Note 15 5G स्पेसिफिकेशन्स
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या रेडमी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर आहे. कंपनीचा दावा आहे की हा हँडसेट 10 टक्के GPU बूस्ट, 30 टक्के वाढलेला CPU परफॉर्मन्स आणि 48 महिन्यांपर्यंत लॅग-फ्री परफॉर्मन्स देईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा फोन जागतिक स्तरावर देखील त्याच चिपसेटसह लाँच झाला आहे. हा प्रोसेसर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह जोडला गेला आहे.
या फोनमध्ये 5520mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर 1.6 दिवसांपर्यंत चालेल असा कंपनीचा दावा आहे. शिवाय, फोन 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. येत्या आठवड्यात Redmi Note 15 5G बद्दल अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
Redmi Note 15 5G ची भारतात किंमत (अपेक्षित)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रेडमी फोनची किंमत 20 हजाराच्या आत असण्याची अपेक्षा आहे. जर असे झाले तर ते कंपनी हा फोन 15 हजार ते 20 हजारच्या किमतीच्या रेंजमधील Vivo, Motorola आणि iQoo सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. फोनची नेमकी किंमत लॉन्च इव्हेंटमध्ये उघड केली जाणार आहे.
भारतात Redmi Note 15 5G लाँच तारीख
हा रेडमी स्मार्टफोन पुढील महिन्यात 6 जानेवारी 2026 रोजी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केला जाईल. स्टँडर्ड रेडमी नोट 15 सोबत, रेडमी नोट 15 5जी 108-मेगापिक्सेल मास्टर एडिशन देखील लाँच करण्यात येणार आहे.
