रेडमीच्या ‘या’ फोनसोबत मिळवा 5000 रुपयांचे इअरबड्स मोफत, उत्तम ऑफरचा लवकर घ्या लाभ
30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या बजेटमध्ये असलेल्या Redmiच्या या स्मार्टफोनवर एक उत्तम ऑफर आहे. कंपनी या फोनसोबत 5 हजार रुपयांचे Redmi Buds 5 मोफत देत आहे. या ऑफरचा फायदा तुम्ही कुठे घेऊ शकता ते जाणून घेऊयात.

तुम्ही जर 30 हजार रूपयांच्या बजेटमध्ये नवीन 5जी फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Redmi Note 14 Pro+ 5जी या किमतीच्या श्रेणीत उत्तम ऑफर असलेला फोन आहे. तसेच तुम्ही हा फोन खरेदी केल्यास कंपनी यावर 5 हजार रुपयांचे रेडमी बड्स 5 मोफत देखील देत आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी फोन कुठे बुक करायचा, ही ऑफर किती काळ आहे आणि या फोनमध्ये कोणते फीचर्स आहेत, त्याची किंमत किती आहे आणि इअरबड्स किती तासांची बॅटरी लाइफ देतात ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
Redmi Note 14 Pro+ 5G ची भारतातील किंमत
तुम्ही Xiaomi च्या अधिकृत वेबसाइट mi.com वरून ही ऑफर चा लाभ घेऊ शकता. या Redmi फोनचे 8/128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट किंमत 26,999 रूपये आहे. तर 8/256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट किंमत 28,999 रूपये आणि 12/512 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट किंमत 31,999 रूपये इतकी आहे. तर हे फोन mi.com वर या किंमतीच्या रेंजमध्ये विकले जात आहेत.
सध्या, Mi.com वर ही ऑफर किती काळ चालेल याबद्दल कोणतीही माहिती नाही, परंतु ही ऑफर मर्यादित काळासाठी असण्याची शक्यता आहे. म्हणून जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
Redmi Note 14 Pro+ 5G या स्मार्टफोनला देणार टक्कर
हा रेडमी फोन MOTOROLA Edge 60 Pro, vivo T4 Pro 5G, realme P4 Pro 5G आणि OnePlus Nord CE5 5G सारख्या स्मार्टफोनला टक्कर देऊ शकतो.
Redmi Note 14 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स
या रेडमी स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा 3डी कर्व्हड एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 7एस जेन 3 प्रोसेसर आणि 90 वॅट फास्ट चार्जिंगसह पॉवरफुल 6200 एमएएच बॅटरी आहे.
फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आहे.
Redmi Buds 5 ची वैशिष्ट्ये
12.4 मिमी ड्रायव्हर्स असलेले हे इअरबड्स कॉलसाठी एआय व्हॉइस एन्हांसमेंट, ड्युअल डिव्हाइस पेअरिंग, प्रत्येक इअरबडमध्ये दोन मायक्रोफोन, अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि 10-मीटर ब्लूटूथ रेंज देतात. इअरबड्सच्या केसमध्ये 480mAh बॅटरी आहे आणि प्रत्येक इअरबडमध्ये 54mAh बॅटरी आहे. पूर्ण चार्ज करण्यासाठी चार्जिंग वेळ अंदाजे 1 तास 45 मिनिटे आहे आणि 10-मिनिटांचा जलद चार्ज 4 तासांपर्यंत बॅटरी लाइफ प्रदान करतो.
