2026 चे आगमन होताच Redmi चा मास्टर पिक्सेल एडिशन बाजारात घेणार धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या फिचर्स
रेडमी चा हा मास्टर पिक्सेल एडिशन पुढील महिन्यात म्हणजेच नवीन वर्षात भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री घेणार आहे. लाँच झाल्यानंतर हा फोन कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल आणि या हँडसेटमध्ये कोणते फीचर्स असतील ते जाणून घेऊयात

भारतीय बाजारपेठेत 2025 या वर्षामध्ये ग्राहकांसाठी अनेक नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते आणि आता याच स्मार्टफोन कंपन्यांनी 2026 ची तयारी सुरू केली आहे. जानेवारीमध्ये रेडमीचा नवीन रेडमी नोट 15 5जी 108 मास्टर पिक्सेल एडिशन तुमच्यासाठी लाँच होणार आहे. या येणाऱ्या रेडमी स्मार्टफोनसाठी अमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाइटवर एक वेगळी मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. लाँच होण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की हा फोन भारतात लाँच झाल्यानंतर Mi.com व्यतिरिक्त अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा रेडमी फोन 6 जानेवारी 2026 रोजी भारतात लाँच होईल. चला तर मग रेडमीच्या या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स याबद्दल जाणून घेऊयात.
रेडमी नोट15 5जी मास्टर पिक्सेल एडिशन फिचर्स
अमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाइटवरील फोनच्या मायक्रोसाइटच्या पुनरावलोकनात काही प्रमुख फिचर्सची पुष्टी झाली आहे, ज्यात 108-मेगापिक्सेल हाय-रिझोल्यूशन रियर कॅमेराचा समावेश आहे. रियर कॅमेरा OIS सह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करेल.
फोन सतत चार्ज करण्याचा त्रास कमी करण्यासाठी कंपनी या हँडसेटमध्ये एक पॉवरफुल 5520 mAh बॅटरी पॅक करेल, जी 45 वॅट जलद चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की या फोनची बॅटरी लाइफ 5 वर्षांपर्यंत आहे, म्हणजेच बॅटरी कोणत्याही समस्येशिवाय पाच वर्षे चालेल.
सध्या फक्त कॅमेरा आणि बॅटरीशी संबंधित माहिती समोर आली आहे. या रेडमी फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी कोणता प्रोसेसर वापरला जाईल? या फोनमध्ये कोणत्या आकाराचा डिस्प्ले असेल? त्याचा रिफ्रेश रेट किती Hz असेल? 108 -मेगापिक्सेलच्या रिअर कॅमेऱ्यासोबत कोणता मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर समाविष्ट असेल? हे फीचर्स अद्याप उघड झालेले नाहीत, परंतु लॉन्चची तारीख जवळ येत असताना, ते उघड होण्याची अपेक्षा आहे.
संभाव्य वैशिष्ट्ये
टिपस्टर यांच्यानुसार अलीकडेच ट्विटरवर येणाऱ्या फोनच्या फिचर्सबद्दल माहिती शेअर केली आहे. यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. दरम्यान, टिप्स्टर सुधांशु अंभोरे यांच्यानुसार या हँडसेटमध्ये 6.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 6 जनरल 3 प्रोसेसर असेल. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित आणि हायपरओएस 2 वर चालण्याची अपेक्षा आहे.
