AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme Narzo 90x 5G आणि Narzo 90 हे स्मार्टफोन भारतात झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि अद्भूत फिचर्स

Realme Narzo 90x 5G आणि Narzo 90 5G भारतात लाँच झाले आहेत. या नवीन स्मार्टफोन्समध्ये पॉवरफुल बॅटरी, AI इरेजर आणि AI एडिटर आहे. चला तर मग जाणून घेऊया या मॉडेल्समध्ये तुम्हाला कोणते खास फीचर्स मिळतील.

Realme Narzo 90x 5G आणि Narzo 90 हे स्मार्टफोन भारतात झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि अद्भूत फिचर्स
Realme Narzo 90x 5g LaunchedImage Credit source: Realme
| Edited By: | Updated on: Dec 17, 2025 | 1:06 AM
Share

Realme Narzo 90x 5G आणि Realme Narzo 90 5G हे स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. हे स्मार्टफोन 7000mAh पॉवरफुल बॅटरीसह भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहेत. Realme Narzo 90 मध्ये बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सारखे फीचर्स देखील आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये AI Eraser, AI Editor आणि AI Ultra Clarity सारखे फीचर्स देखील आहेत. 90x 5G मध्ये मोठ्या आवाजासाठी 400% अल्ट्रा व्हॉल्यूम स्पीकर्स आहेत. तर हे दोन्ही मॉडल्स कमी किमतीच्या रेंज मध्ये लॉंच केले आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या दोन्ही मॉडल्सच्या किंमती आणि खास फिचर्स बद्दल जाणून घेऊयात.

Realme Narzo 90x 5G ची भारतातील किंमत

या Realme फोनच्या बेसिक 6GB/128 GB व्हेरिएंटची किंमत 13,999आहे, तर टॉप 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 15,499 आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये हा फोन Vivo T4x 5G आणि Realme P4x 5G सारख्या स्मार्टफोनला टक्कर देणार आहे.

Realme Narzo 90 5G ची भारतात किंमत

Realme Narzo 90 5G या फोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 16,999 रूपयांमध्ये मध्ये लाँच करण्यात आला आहे. तर यातील टॉप-एंड 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 18,499 रूपये आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये ते Samsung Galaxy A35 5G आणि Motorola G86 Power 5G सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. दोन्ही स्मार्टफोनची विक्री 24 डिसेंबरपासून Realme च्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर सुरू होईल.

Realme Narzo 90 5G स्पेसिफिकेशन्स

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 7000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी 60 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.57-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे जो 4000 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240 हर्ट्झ पर्यंत टच सॅम्पलिंग रेट देखील आहे.

कॅमेरा: 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम सेकंडरी सेन्सरसह जोडला गेला आहे. समोर, 50 -मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 मॅक्स चिपसेट वापरण्यात आला आहे.

Realme Narzo 90x 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.80-इंचाची स्क्रीन आहे जी 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह येते.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 60 वॅट फास्ट चार्जिंगसह 7000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा सोनी एआय कॅमेरा सेन्सर आणि समोर 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असेल.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.