FD Rates: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदवार्ता! एफडीवर थेट 8.3 टक्के व्याज, सर्वाधिक परतावा देणाऱ्या बँकांची यादीच पाहा
FD Rates Senior Citizens: जोखीम मुक्त, सुरक्षित आणि जबरदस्त परतावा हवा असेल तर मग काही बँकांतील आकर्षक मुदत ठेव योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर खास वाढीव व्याजदर देतात. एफडीवर थेट 8.3 टक्के व्याज देणाऱ्या बँकांची यादीच पाहा.

ज्येष्ठ नागरिक सुरक्षित, जोखीम मुक्त आणि अधिक परतावा देणार्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बँका मुदत ठेवीवर अधिक व्याजदर देतात. 60 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या गुंतवणूकदारांसाठी या बँका 8.3 टक्के दराने व्याज देतात. काही मोठ्या सरकारी बँका, खासगी क्षेत्रातील बँका जवळपास 6.6% ते 7.75% दरम्यान एफडीवर व्याज देतात. तर छोट्या बँका ज्येष्ठ नागरिकांना अधिक चांगला परतावा देतात. मोठ्या बँकांपेक्षा त्या अधिक व्याज देतात. खासकरून 1 ते 3 वर्षांच्या कालावधीत मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळतो.
स्मॉल फायनान्स बँकांमध्ये सर्वाधिक व्याजदर
जना स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.3% व्याज देते
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवीवर 8 टक्के व्याज देते
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांकरीता 8 टक्के व्याज देते
एयु स्मॉल फायनान्स बँकेचा व्याजदर 7.90 टक्के
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 7.60 टक्के
ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक 6.50 टक्के
स्लाईस स्मॉल फायनान्स बँक 7.50 टक्के
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक 7.40 टक्के
उज्ज्वीन स्मॉल फायनान्स बँक 7.75 टक्के
बँक एफडी नियमांत मोठा फेरबदल
भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी मुदत ठेवींचे नियम बदलले आहेत. 1 ऑक्टोबर 2026 पासून मुदत ठेवीसंदर्भात नवीन नियम लागू होतील. त्यानुसार सर्व बँकांना सकाळी 10:10 वाजेपर्यंत त्यांच्या साईटवर एफडीचे व्याजदर जाहीर करणे आणि 3 कोटी अथवा त्याहून अधिक एकरक्कमी मोठ्या डिपॉझिटसाठी सर्व ग्राहकांना समान दर लागू करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
एक देश, एक बँक, एक व्याजदर धोरण
एकाच दिवशी, समान कालावधीसाठी आणि समान रक्कमेची एफडी करणाऱ्या सर्व ग्राहकांना देशात आता एकच व्याजदर मिळेल. ग्राहक बँकेच्या कोणत्याही शाखेत गेला अथवा तो जुना असेल अथवा नवीन, व्याजदरात बँकांना आता कोणताही बदल, भेदभाव करता येणार नाही असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. देशातील सर्व बँकांना प्रत्येक कामकाज्या दिवशी सकाळी 10 ते 10:10 वाजेदरम्यान त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर त्या दिवशीचे एफडी व्याजदर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहेत.
डिस्क्लेमर: स्मॉल फायनान्स बँकांमधील ठेवींवर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण असते. या बँकांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. TV9 मराठी गुंतवणुकीचा कोणताही सल्ला देत नाही. प्रस्तुत लेख हा माहितीपर आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणूक तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.