AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशखबर!, 100 पेटीएम भाग्यवंतांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार मोफत

Free LPG Cylinder: पेटीएमने त्यांच्या ग्राहकांसाठी मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना आणली आहे. अर्थात 100 वापरकर्त्यांना हा मान मिळणार आहे. त्यांना गॅस बुकिंगवर ऑफर आहे. त्यातील एक ऑफर म्हणजे हजार रुपयाचं एक गॅस सिलेंडर संपूर्णतः मोफत मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकाला एक छदामही द्यावा लागणार नाही.

खुशखबर!, 100 पेटीएम भाग्यवंतांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार मोफत
पेटीएम आयपीओ
| Updated on: Feb 04, 2022 | 7:42 AM
Share

मुंबई : प्रत्येक युपीआय पेमेंट वॅलेट (UPI Payment Wallet) सेवा पुरवठादार वापरकर्त्यासाठी रोज नव-नव्या ऑफर्स उपलब्ध करुन देते. कॅशबॅक, अधिकच्या खरेदीवर डिस्काऊंट अथवा इतर कंपन्यांचे शॉपिंग कुपन इतर काही योजना, सूट, सवलत आणि बरचं काही दररोज तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आदळत असते. पण त्यातील काहीच योजना, संधी कामाच्या असतात. कॅशबॅक अथवा पाईंटस्, रिवॉर्डस् यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा मिळतो. काही कंपन्या भन्नाट ऑफर्स घेऊन येतात. ही संधी तुम्हाला हेरता आणि मिळवता आली तर तो दिवस साजरा होतो. पेटीएमने (Paytm)नेही ग्राहकांसाठी अशीच भन्नाट योजना आणली आहे. पेटीएमने आपल्या युजर्ससाठी एलपीजी सिलेंडर बुकिंगवर मोठी ऑफर (offer) दिली आहे.

पेटीएमकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. एका ऑफर अंतर्गत तुम्हाला 25 पौंडची सूट मिळू शकते, तर दुसरी ऑफर म्हणजे तुम्हाला पेटीएम कॅशबॅक म्हणून 30 पौंड मिळू शकतात. तसेच तिसरी ऑफर सध्या सुरू आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला एलपीजी सिलेंडर मोफत(Free LPG Cylinder) मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला एक पैसाही द्यावा लागणार नाही

या सर्व व्यवहारासाठी एक सामान्य आणि आवश्यक अट म्हणजे हे बुकिंग पेटीएमद्वारे केलेले असावे. अजून एक अट म्हणजे पेटीएमवरुन गॅस बुकिंग करण्याची ही तुमची पहिली वेळ असावी. पेटीएममध्ये ग्राहकांसमोर तिन्ही पर्याय असतील. तुम्हाला 25 रुपयांची सूट हवी असेल तर तुम्हाला ती लगेच मिळेल. जर तुम्हाला 30 रुपयांचा कॅशबॅक हवा असेल तर तुम्हाला पेटीएम कॅश मिळेल. यासाठी वेगवेगळे प्रोमोकोड देण्यात आले आहेत, जे बुकिंगच्या वेळी द्यावे लागतील. पण फुकटात, 100 टक्के कॅशबॅक मिळवण्यासाठी तुमचं नशीब जोरावर पाहिजे. नशिबाने साथ दिल्यास तुम्हाला एक महिन्याचा गॅस पूर्णतः मोफत मिळेल. त्यासाठी तुम्हाला एक छदामही द्यावा लागणार नाही.

28 फेब्रुवारीपर्यंत आजमा नशीब मोफत एलपीजी सिलेंडर मिळण्यासाठी बुकिंगच्या वेळी फ्री सिलेंडर प्रोमोकोडचा वापर करावा लागतो. बुकिंगच्या वेळी तुमच्या सिलेंडरला पूर्ण पैसे द्यावे लागतील. यानंतर पेटीएमच्या प्रत्येक 100 व्या गॅस सिलेंडरचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला पूर्ण कॅशबॅक (100% Cashback) देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाईल, म्हणजेच तुम्हाला सिंगल सिलेंडर बुक करावा लागेल. ही ऑफर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंतच वैध आहेत. जर तुम्ही 100 ग्राहकांमधील एक लकी कस्टमर बनलात तर तुम्हाला 24 तासांच्या आत कॅशबॅक मिळेल.

पेटीएमवर गॅस सिलिंडर बुक करा तुम्ही इंडेन, एचपी गॅस आणि भारतगॅसमधून कोणत्याही कंपनीचे सिलेंडर बुक करू शकता. ‘बुक माय सिलिंडर’ टॅबवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक किंवा एलपीजी आयडी किंवा ग्राहक क्रमांक टाकावा लागेल. यात प्रवेश करताच तुम्हाला तुमच्या एजन्सीची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंटसाठी तुम्हाला पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंगचे पर्याय उपलब्ध असतील. एकदा बुकिंग झालं की, तुमच्या पत्त्यावर एजन्सीकडून सिलेंडर पोहोचवला जाईल.

संबंधीत बातम्या :

Budget 2022 : अर्थसंकल्पात दिलासा नाही ; शेवटी बचत पण तर आहे कमाई

BUDGET 2022: चुकीला माफी, पण दंड भरुन..! आयटीआर नियमात बदल, ‘ही’ अट महत्वाची

Union Budget 2022 Share market : ‘हे’ स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओत असालयाच हवेत, ‘या’ पाच क्षेत्रातील शेअर तुम्हाला करतील मालामाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.