AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Mall Collapse: 5 जणांचा जीव घेणारी घटना नेमकी कशी घडली? जमीन कुणाची? साईट कुणाची? सुरक्षा नियमांचे तीन तेरा?

फारूक वाडिया यांची ही जमीन असून अहलूवालिया यांची साईट आहे. मॉलचे काम असून तळ मजल्याचा स्लॅब कोसळून घटना घडली. या संदर्भात गुन्हा दाखल होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी केली.

Pune Mall Collapse: 5 जणांचा जीव घेणारी घटना नेमकी कशी घडली? जमीन कुणाची? साईट कुणाची? सुरक्षा नियमांचे तीन तेरा?
पुण्यात स्लॅब कोसळून मजुरांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 7:03 AM
Share

पुणे : पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब (Pune Building Slab Collapse) कोसळून गुरुवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकून पाच कामगारांना (Labors Death) जागीच प्राण गमवावे लागले, तर किमान पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व कामगार परराज्यातील असल्याचं येरवडा पोलिसांनी सांगितलं. मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे. तर फारुक वाडिया यांची ही जमीन असून अहलुवालिया यांची साईट असल्याचं राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितलं. आगामी अधिवेशनात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही टिंगरे म्हणाले. त्यामुळे दुर्घटनेला अवघे काही तास होत नाहीत, तोच राजकारण रंगल्याचं चित्र आहे.

सुरक्षा नियमांचे तीन तेरा?

मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. स्लॅब टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, शिवाय सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचा आमदार आक्रमक

आगामी अधिवेशनात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात मुद्दा उपस्थित करणार आहे. फारूक वाडिया यांची ही जमीन असून अहलूवालिया यांची साईट आहे. मॉलचे काम असून तळ मजल्याचा स्लॅब कोसळून घटना घडली. या संदर्भात गुन्हा दाखल होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी केली.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे. ही घटना रात्री 10.45 वाजताच्या सुमारास येरवाड्यातील शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठ नजीक घडली आहे. या दुर्घटनेत तळ मजल्यावरील कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्लॅब टाकताना दुर्घटना घडल्याचा अंदाज

स्लॅबच्या जाळ्यामध्ये अडकलेल्यांपैकी काही जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. इमारतीचे बांधकाम सुरु असताना स्लॅब टाकायचे काम सुरु होते. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने चार गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. तातडीच्या बचावकार्यामुळे काहींच्या जीविताचा धोका टळला. या बचावकार्यामध्ये स्थानिक रहिवाशांनीही पुढे येऊन मदत केली. अनेकांनी अग्निशमन दलाच्या गाड्या येण्याआधी मदतीसाठी तातडीचे प्रयत्न सुरु केले होते. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दुर्घटनेबाबत ट्विट करून घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असे ट्विट महापौर मोहोळ यांनी केले.

कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्य

महापालिकेच्या जवानांना स्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामगार स्लॅबच्या लोखंडी गजांखाली अडकले होते. त्यामुळे त्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला करावा लागला. यात गंभीर अवस्थेतील काही जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. यावेळी जवानांनी एका मागोमाग एक कामगारांना बाहेर काढले, मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पुण्यात बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली, पाच ठार; पाच जण जखमी

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.