Union Budget 2022 Share market : ‘हे’ स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओत असालयाच हवेत, ‘या’ पाच क्षेत्रातील शेअर तुम्हाला करतील मालामाल

शेअर मार्केटवर अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून आला. काल बाजारात शेअर्सनी चांगली उसळी मारली. भविष्यातील तरतुदीसाठी तुमच्या पोर्टफोलिओत या पाच क्षेत्रातील स्टॉक्स असणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात या क्षेत्रांना सरकारने प्रोत्साहन दिले आहे. या क्षेत्रातील स्टॉक्स तुम्हाला भविष्यात मालामाल करू शकतात.

Union Budget 2022 Share market : 'हे' स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओत असालयाच हवेत, 'या' पाच क्षेत्रातील शेअर तुम्हाला करतील मालामाल
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 11:59 AM

Budget 2022 Share market : काल अर्थसंकल्प (Union Budget) सादर होत असताना शेअर मार्केट उसळ्या घेत होते. अनेक शेअर्सनी चांगली कामगिरी केली. सरकारने ज्या ज्या क्षेत्रात प्रोत्साहन योजना राबविण्याचे ठरविले त्यातील स्टॉक्स भविष्यात जोरदार मुसंडी मारतील हे नक्कीच. पण हे शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) आहेत की नाही, याची खात्री करुन घ्या. या अर्थसंकल्पात सरकारने इन्फ्रा, इलेक्ट्रिक व्हेइकलसारख्या क्षेत्रांसाठी (Electric Vehicle Sector) मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घरांची उभारणी, नळ-पाणी योजना आदींमध्ये ही मोठ्या प्रमाणात सरकार निधीचे वाटप करणार आहे. सहाजिकच याचा फायदा अनेक क्षेत्रातील कंपन्यांना होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चौथा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचा आकार वाढला असून अर्थसंकल्प 40 लाख कोटींच्या घरात पोहोचला आहे. पायाभूत सुविधांसह सरकारने अनेक इतर योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच भविष्याच्या दृष्टीने अनेक योजनांना अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे त्या-त्या क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तुम्ही आताच गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला मोठ्या कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

विविध योजनांवर भर

पायाभूत सुविधांसह सरकारने पंतप्रधान आवास योजना (PM Aawas Yojana), नल-जल योजना (Nal-jal Yojana), डिजिटल करंसी (Digital Currency), क्रिप्टोकरंसी योजनेवर भरभक्कम कर अशा अनेक योजनांची घोषणा केली. क्रिप्टोत सरकारकडून गुंतवणुकदारांचा हिरमोड झाला. पण दुस-या अनेक संधी गुंतवणुकदारांना उपलब्ध झाल्या आहेत या सेक्टरमध्ये गुंतवणूक भविष्यात गुंतवणुकदारांना मालामाल करु शकतात. त्यांना अशा क्षेत्रात गुंतवणुकीचे पर्याय शोधणे गरजेचे राहिल. काही क्षेत्रात निराशा पदरी पडली असली तरी अभ्यास केल्यास अनेक क्षेत्रात गुंतवणुकदारांना चांगल्या संधी गवसतील. अर्थसंकल्पात अशा क्षेत्रांना सरकारने पाठबळ दिले आहे.

इलेक्ट्रिक व्हेइकलवर लक्ष

सरकारने अपेक्षेनुसार इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटवर (EV Segment) लक्ष केंद्रित केले आहे. इन्फ्रा सेक्टरमध्ये दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे टाकण्यापासून आणि शहरी वाहतूक सुधारणे अशा 400 नव्या वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.त्याचप्रमाणे नल-जल योजनेसाठी सरकारने 60 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. सौर ऊर्जा क्षेत्रासाठी पीएलआय योजना (PLI- Solar Sector), पीएम आवास योजनेअंतर्गत 80 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट, यंदा 5जीचे प्रक्षेपण, डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर(Digital Economy), संरक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष (Defence Sector)केंद्रित करणे आदी अर्थसंकल्पातील अन्य प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

हे तर सुपर बजेट :

शेअर बाजार तज्ज्ञानुसार, या बजेटमुळे गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची संधी मिळाली आहे. सीएनआय रिसर्चचे किशोर ओस्तवाल यांनी याला सुपर बजेट म्हटले आहे. त्यांनी अशा क्षेत्रांची नावे सांगितली की, त्यातील स्टॉक भविष्यात मोठी मजल मारू शकतात. या 5 क्षेत्रातील शेअर्स गुंतवणुकदारांना मोठी कमाई करू शकतात.

ईव्ही सेक्टर

अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष धोरणाची चर्चा करण्यात आली आहे. लवकरच बॅटरी स्वॅपिंगबाबतचे नवे धोरण जाहीर करण्यात येणार आहे. स्वच्छ व प्रदुषण विरहित वाहतुकीला चालना देण्याच्या प्रयत्नात सरकार आधीपासूनच गुंतले आहे. याचा थेट फायदा येत्या काळात बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे एक्साइड इंडस्ट्रीज (Exide Industries) आणि अमारा राजा बॅटरीस (Amara Raja Batteris) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या कमाईच्या संधी आहेत.

Infra & Transport :

दुर्गम भागात रस्ते बांधणे, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक सेवा पूर्ववत करणे आणि येत्या तीन वर्षांत 400 नव्या वंदे भारत गाड्या सुरू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. याचा थेट फायदा इन्फ्रा आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील समभागांना होऊ शकतो. या दोन सेक्टरमध्ये एल अँड टी, जीएमआर इन्फ्रा, कंटेनर कॉर्पोरेशन आणि आयआरसीटीसी या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करता येतील.

Metal & Solar :

सुमारे 4 कोटी कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी सरकारने 60 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय लॉजिस्टिकवरही सरकारचा विशेष भर आहे. सौर ऊर्जा क्षेत्रासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांची पीएलआय योजना जाहीर करण्यात आली आहे. Tata Steel, Vedanta, JSW Steels, Kirloskar Brothers, Tata Power, Adani Enterprises, Reliance Industries या कंपन्यांचे शेअर्स फायदा मिळवून देऊ शकतो.

Telecom

अर्थसंकल्पात सरकारने यंदा 5 जी सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यंदा स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. देशात डेटा स्टोरेजला प्रोत्साहन देण्याचीही सरकारची योजना आहे. Bharti Airtel, MTNL, Tejas Networks या स्टॉक्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

एक राष्ट्र एक डिजिटल आयडी, पॅन, आधार कार्ड, वाहन परवान्यासह पासपोर्ट एकत्रित गुंफणार

इनकम टॅक्स भरण्याआधी टॅक्स रेजिम म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणं महत्त्वाचंय!

Budget 2022 : मनमोहन Vs मोदी सरकार, कोणाच्या काळात करदात्याला दिलासा, कोणामुळे रिकामा झाला खिसा?

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.