AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : मुंबईत पेट्रोलचा उच्चांक, डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय? जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 31-39 पैसे तर डिझेलच्या दरात 09-15 पैशांनी वाढ केली आहे.

Petrol Diesel Price : मुंबईत पेट्रोलचा उच्चांक, डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय? जाणून घ्या
पेट्रोल-डिझेल
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 7:52 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 31-39 पैसे तर डिझेलच्या दरात 09-15 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे देशभरात सर्वच राज्यात पेट्रोल-डिझेलची किंमत ही नव्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 106.59 रुपये आणि डिझेलचा प्रतिलिटर दर 97.18 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 8 July 2021)

मुंबईत पेट्रोलची किंमत 106.59 रुपयांच्या पार 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आज (8 जुलै) इंधन दरवाढीसह दिल्लीत पेट्रोलची किरकोळ किंमत 100.56 रुपयांवर पोहोचली आहे. तर डिझेलची किरकोळ किंमत ही प्रतिलिटर 89.62 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच आर्थिक राजधानी मुंबईत आज एका लीटर पेट्रोलची किंमत ही 106.59 रुपये असून डिझेलची किंमत प्रतिलिटर 97.18 रुपयांवर पोहोचली आहे.

जुलैमध्ये सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

दरम्यान जुलै महिन्यात सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर तिसऱ्यांदा डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

शहर  पेट्रोल (रुपये/लीटर)  डिझेल (रुपये/लीटर)
नवी दिल्‍ली  100.56 89.62
मुंबई 106.59 97.18
कोलकाता 100.62 92.65
चेन्‍नई 101.37 94.15
नोएडा  97.78 90.09
बंगळूरु 103.93 94.99
हैदराबाद 104.50 97.68
पाटणा 102.79 95.14
जयपूर 107.37 98.74
लखनऊ 97.67 90.01
गुरुग्राम 98.22 90.22
चंदीगढ 96.70 89.25

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

(Petrol Diesel Price Fuel Rate Today 8 July 2021)

संबंधित बातम्या : 

Income Tax Return : इनकम टॅक्‍स रिटर्न भरले नाही तर काय होईल? उद्भवू शकतात या समस्या

तुमचा आधार ईपीएफ खात्याशी लिंक नाही, मग खात्यात जमा होणार नाहीत पैसे, असे करा लिंक

मोदी सरकारची मोठी घोषणा, शेणापासून तयार होणाऱ्या रंगामुळे शेतकऱ्यांना मिळणार फायदा

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...