राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रः व्याजसह कर सवलतीचा ही फायदा गुंतवणूक तुमच्या फायद्याची..!

| Updated on: Feb 11, 2022 | 2:48 PM

पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचाही ( NSC ) समावेश आहे. या योजनेत चांगल्या व्याजासह कर सवलतीचा फायदा ग्राहकाला मिळतो. ही गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरते. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रः व्याजसह कर सवलतीचा ही फायदा गुंतवणूक तुमच्या फायद्याची..!
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या देशात उपलब्ध आहेत. यात एलआयसी, बॅंकेत फिक्स डिपॉझिट, शेअर बाजार, रिअल इस्टेट असे अनेक पर्याय आहेत. असे अनेक पर्याय उपलब्ध असतांना सर्वात भरवशाचा पर्याय म्हणून टपाल खात्याच्या (Post Office) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचाही (NSC) समावेश आहे. पोस्टाच्या अल्पबचत योजनेत (Small Saving Scheme) गुंतवणुकीचा पर्याय हा सर्वात सुरक्षित आणि परतावा देणारा मानण्यात येतो. बँकेतील योजनेत पैसा गुंतववल्यास आणि बँक दिवाळखोरीत गेल्यास तुम्हाला पाच लाखांची नुकसान भरपाई मिळेल, जर तुम्हची गुंतवलेली रक्कम जास्त असली तरी. मात्र टपाल खात्याला सरकारचे संरक्षण आहे. त्यामुळे टपाल खात्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी आहे. या बचत योजनेत कमीत कमी रक्कमेपासून सुरुवात करता येते. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचाही (NSC) योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत सध्या 6.8 टक्के व्याजदर मिळते. यातील व्याज चक्रवाढ दराने मिळते. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर व्याजासहित रक्कम मिळते. 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांच्या कालावधीनंतर 1389.49 रुपये होते.

गुंतवणूक रक्कम

या अल्पबचत योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. व्यक्तीला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीवर कुठलीही अधिकत्तम मर्यादा नाही

खाते कोण उघडू शकेल?

नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, तीन ज्येष्ठ व्यक्ती मिळून संयुक्त खाते उघडता येईल. याशिवाय या योजनेत सज्ञान नसलेल्या व्यक्ती अथवा लहान मुले पालकांच्या देखरेखीखाली खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत 10 वर्षांवरील अल्पवयीन मुलालाही स्वतःच्या नावावर खाते उघडता येणार आहे.

योजना कालावधी

या अल्पबचत योजनेत गुंतवलेली रक्कम ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर व्याजासह परत मिळते.

योजनेची इतर वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतील.
या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत वजावटीसाठी दावा करता येतो.
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमध्ये 5 वर्षांच्या मुदतीपूर्वीच खाते बंद करता येईल.
यामध्ये एकल खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा संयुक्त खात्यातील सर्व खातेदारांच्या मृत्यूनंतर खाते बंद करता येते.
याशिवाय कोर्टाच्या आदेशानुसार खातेही बंद करता येईल

सुकन्या समृद्धी योजना

पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश आहे. सुकन्या समृद्धी योजनेत सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे.एका आर्थिक वर्षात या अल्पबचत योजनेत किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.

ग्राम सुरक्षा योजना

टपाल खात्याच्या ग्राम सुरक्षा योजना किंवा ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराने या योजनेत मासिक 1,500 रुपये जमा केल्यास त्याला 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. ही योजना किशोरवयीन मुलांसाठी गुंतवणूकीचा फायदेशीर पर्याय आहे. ग्राम सुरक्षा योजनेसाठी कमीत कमी 19 वर्षे वयाची अट आहे. तर जास्तीत जास्त 55 वर्षे कमाल मर्यादा आहे. भारतीय टपाल खात्याच्या वेबसाइटवर याविषयी माहिती दिली आहे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक त्यासाठी पात्र ठरतो.या योजनेअंतर्गत किमान 10,000 रुपये ते कमाल 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत 80 वर्षे वयाच्या अथवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर वारसदारांना बोनससह खात्रीशीर रक्कम मिळू शकते.

संबंधित बातम्या :

LIC IPO news: एलआयसी विमाधारकांना बंटर लॉटरी? आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना किती मिळणार सूट, आज कळणार माहिती

Zero Balance Account: दंड ही भरायची गरज नाही आणि बँकेत हक्काचे खाते ही असेल

अचानक झालेला धनलाभ ही डोकेदुखी ठरेल, औरंगाबादच्या जनार्दन औटेंसारखी चूक करणं महागात पडेल