रक्षाबंधननिमित्त एसबीआयची मोठी डिस्काऊंट ऑफर; या अ‍ॅपवरून करावे लागेल शॉपिंग

एसबीआयमार्फत ऑनलाईन खरेदीवर सवलतीचा लाभ दिला जात आहे. एसबीआयच्या मते, जर फर्न्स एंट पेटल्स कंपनीचे गिफ्ट अर्थात भेटवस्तू खरेदी केली तर 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. मात्र, ही सवलत फक्त रु. 999 पर्यंतच्या भेटवस्तूंवर लागू आहे.

रक्षाबंधननिमित्त एसबीआयची मोठी डिस्काऊंट ऑफर; या अ‍ॅपवरून करावे लागेल शॉपिंग
एसबीआय
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 8:06 AM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत रक्षाबंधनच्या खरेदीवर विशेष डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. जर योनो अ‍ॅपद्वारे खरेदी केली गेली तर 20 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. यावर्षीच्या कोरोना महामारीत रक्षाबंधन हा पहिला सण असून ज्या सणाला लोक जोरदार खरेदी करीत आहेत. बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक ग्राहक ऑनलाईन खरेदीकडे तितकेच अधिक लक्ष देत आहेत. या ऑनलाईन शॉपिंगचा फायदा घेण्यासाठी एसबीआयने रक्षाबंधननिमित्त विशेष ऑफर सुरू केली आहे. (SBI offers big discount for Rakshabandhan, Shopping has to be done from this app)

योनो एसबीआय अ‍ॅप सवलतीचा लाभ

भाऊ आपल्या बहिणींसाठी किंवा बहिण आपल्या भावासाठी रक्षाबंधननिमित्त खरेदी करण्याच्या बेतात असतील. या भाऊ-बहिणींचा यंदाचा रक्षाबंधन अधिक शानदार करण्यासाठी भेटवस्तू खरेदीवर एसबीआयच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. एसबीआयमार्फत ऑनलाईन खरेदीवर सवलतीचा लाभ दिला जात आहे. एसबीआयच्या मते, जर फर्न्स एंट पेटल्स कंपनीचे गिफ्ट अर्थात भेटवस्तू खरेदी केली तर 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. मात्र, ही सवलत फक्त रु. 999 पर्यंतच्या भेटवस्तूंवर लागू आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एसबीआय योनो एसबीआय अ‍ॅप वापरावे लागेल. तुम्हाला या अ‍ॅपद्वारे सवलतीचा लाभ मिळेल.

किती रुपयांच्या खरेदीवर मिळणार लाभ

भेटवस्तू खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटचा लाभ घेण्यासाठी आपल्याला योनो अ‍ॅपद्वारेच पेमेंट करावे लागेल. या ऑफरबाबत कोणत्याही ग्राहकाला काही प्रश्न असल्यास, ते एसबीआय योनोच्या अधिकृत वेबसाइटला किंवा sbiyono.sbi वर भेट देऊ शकतात. एसबीआयने या ऑफरची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, रक्षाबंधनाचा सण मोठ्या ऑफरसह साजरा करा. फर्न्स एन पेटल्सवर खरेदी करा आणि 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळवा. एसबीआय योनोकडून 999 रुपयांच्या खरेदीवर हा लाभ दिला जात आहे. योनो एसबीआयचे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी sbiyono.sbi/index.html यावर क्लिक करा.

कधीपर्यंत असेल ही ऑफर

एसबीआयची ही ऑफर केवळ 22 ऑगस्टपर्यंत वैध आहे. रक्षाबंधनचा सण 22 ऑगस्ट रोजी आहे. त्या दिवसापर्यंत 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर मिळू शकते. या ऑफरमध्ये खरेदीची किमान मर्यादा नाही. तथापि, कमाल मर्यादा 999 रुपये आहे. फक्त 999 रुपयांपर्यंतच्या खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यासाठी एसबीआयने एक कोड जारी केला आहे. हा कोड क्रमांक SBI20 आहे. हा कोड खरेदी करताना लागू करावा लागेल. हेदेखील लक्षात ठेवा की ही ऑफर रक्षाबंधन लक्षात घेऊन देण्यात आली आहे. त्यामुळे या डिस्काऊंट ऑफरची तारीख वाढवली जाणार नाही. 22 ऑगस्टपर्यंतच ही ऑफर वैध असेल.

ग्राहकांसाठी आणखी एक ऑफर

ग्राहकांना अशाच प्रकारची आणखी सवलत मिळणार आहे. जर lifestylestore.com वरून वस्तू खरेदी केली तर त्यावर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तुम्ही या स्टोअरच्या माध्यमातून आपल्या कपड्यांसह लक्झरी वस्तू आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीज खरेदी करू शकता. त्याची खरेदीदेखील योनो अ‍ॅपद्वारे करावी लागेल. जर एखाद्या ग्राहकाने एसबीआय कार्डने खरेदी केली तर त्याला 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकदेखील दिला जाईल. (SBI offers big discount for Rakshabandhan, Shopping has to be done from this app)

इतर बातम्या

PHOTO | Rhea Kapoor Wedding : पती आनंदसोबत सोनम कपूर पोहचली बहिणीच्या लग्नात, अनिल कपूरने छायाचित्रकारांना वाटली मिठाई

Twitter ची ‘ब्लू टिक’ व्हेरिफिकेशन प्रोसेस पुन्हा बंद, ‘इतके’ दिवस वाट पाहावी लागणार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.