Twitter ची ‘ब्लू टिक’ व्हेरिफिकेशन प्रोसेस पुन्हा बंद, ‘इतके’ दिवस वाट पाहावी लागणार

अलीकडच्या काळात ट्विटरने (Twitter) सेलेब्स आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात 'ब्लू टिक' वितरित केल्या आहेत.

Twitter ची ‘ब्लू टिक’ व्हेरिफिकेशन प्रोसेस पुन्हा बंद, 'इतके' दिवस वाट पाहावी लागणार
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 7:16 PM

मुंबई : अलीकडच्या काळात ट्विटरने (Twitter) सेलेब्स आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात ‘ब्लू टिक’ वितरित केल्या आहेत. त्यामुळे तुम्हालाही आता तुमच्या ट्विटर अकाऊंटसाठी ब्लू टिक हवी असेल तर तुम्ही दुर्दैवी आहात. कारण ट्विटरने इच्छुक वापरकर्त्यांचे अर्ज आणि पुनरावलोकन प्रक्रियेतील (रिव्ह्यू प्रोसेस) सुधारणांमुळे पडताळणी प्रक्रिया तात्पुरती थांबवली असल्याची पुष्टी केली आहे. (Twitter stops blue tick verification process once again)

ट्विटर व्हेरिफाईड हँडलने आपल्या वापरकर्त्यांशी नुकताच संपर्क साधला आहे आणि लोकांना प्रक्रिया सुधारित होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. मात्र ही प्रक्रिया कधी सुरु होईल याबाबत कोणत्याही तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही, याचा अर्थ असा होऊ शकतो की, आपल्याला काही आठवडे किंवा कदाचित महिने याची प्रतीक्षा करावी लागेल. ट्विटरने नॉन-व्हेरिफाईड युजर्सना प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. तसेच ही सेवा लवकरात लवकर परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.

ट्विटरची “ब्लू टिक” प्रोसेस स्थगित

ट्विटरने आपल्या ताज्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही व्हेरीफिकेशनसाठी अर्ज करण्यासाठी रोल आउट प्रवेश तात्पुरता थांबवला आहे. जेणेकरून आम्ही अर्ज आणि रिव्ह्यू प्रोसेस सुधारू शकू. जे प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी हे खूपच निराशाजनक असू शकते, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्हाला काही गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत, त्यामुळे आम्ही तुमच्या संयमाचे कौतुक करतो.

एका वापरकर्त्याने विचारले की, ब्लू टिकसाठीची प्रक्रिया सुरु करण्यास किती वेळ लागेल, तेव्हा कंपनीने उत्तर दिले की, “अधिक लोकांना अर्ज करण्याचा पर्याय देण्यापूर्वी आम्ही अप्लाय आणि पुनरावलोकन प्रक्रियेत (रिव्ह्यू प्रोसेस) काही सुधारणा लागू करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही पुन्हा यासाठीचा अॅक्सेस सुरू केल्यावर सर्वांना कळवू. काळजी करू नका, आम्ही शक्य तितक्या लवकर प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचा रिव्ह्यू करण्याचे काम करत आहोत.

केवळ याच कॅटेगरीतील लोकांना ट्विटरकडून व्हेरिफिकेशन दिलं जातं

  • सरकार
  • कंपन्या, ब्रँड आणि संस्था
  • वृत्तसंस्था आणि पत्रकार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स आणि गेमिंग
  • कामगार, आयोजक आणि इतर प्रभावशाली व्यक्ती

इतर बातम्या

डेल्टा व्हेरिएंटची भीती, गुगल, अमेझॉननंतर Facebook कडून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय स्थगित

टिकटॉकवर आपण असे बदलू शकता आपले वय, वापरकर्त्यांसाठी डिझाईन केले हे खास वैशिष्ट्य

Whatsapp वेब, डेस्कटॉप युजर्सना फोटो एडिटिंगपासून ते डिसअपियरर्यंतचे सगळे फीचर्स मिळणार!

(Twitter stops blue tick verification process once again)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.