या कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका लाखाचे झाले 37 लाख

Share Market | याचा अर्थ गेल्यावर्षी 29 जूनपूर्वी तुम्ही या समभागात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 37 लाखांवर पोहोचली आहे. यंदाच्या जून तिमाहीत गीता रीन्यूबल एनर्जीने चांगला नफाही कमावला आहे.

या कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका लाखाचे झाले 37 लाख
शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 6:51 AM

मुंबई: सध्या शेअर बाजारात गीता रीन्यूबल एनर्जी (Gita Renewable Energy) या कंपनीच्या समभागाची प्रचंड चर्चा आहे. पेनी स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 3600 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी 29 जूनला गीता रीन्यूबल एनर्जीच्या समभागाची किंमत अवघी 5.50 रुपये इतकी होती. मात्र, आज एक वर्षानंतर या समभागाने 194.15 रुपयांपर्यंत झेप घेतली आहे. 30 जुलैला तर या समभागाने 203.85 रुपयांचा सार्वकालिक उच्चांकही गाठला होता. त्यामुळे शुक्रवारी भांडवली बाजारात 5 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर या समभागाला अप्पर सर्किट लागला होता.

याचा अर्थ गेल्यावर्षी 29 जूनपूर्वी तुम्ही या समभागात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 37 लाखांवर पोहोचली आहे. यंदाच्या जून तिमाहीत गीता रीन्यूबल एनर्जीने चांगला नफाही कमावला आहे. 2010 मध्ये तामिळनाडूत या कंपनीची स्थापना झाली होती. सप्टेंबर 2017 पासून ही कंपनी तोट्यात होती. केवळ 2021 च्या मार्च तिमाहीत या कंपनीने 15 लाखांचा नफा कमावला होता. त्यामुळे या कंपनीची वाटचाल काहीशी संशयास्पदही असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या कंपनीचे तब्बल 11.08 लाख शेअर्स 4191 गुंतवणुकदारांच्या ताब्यात आहेत. यापैकी 3947 गुंतवणुकदारांकडे कंपनीचे तब्बल दोन लाख समभाग आहेत.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली आहे.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.