Insurance | चारचाकी सतत दाराशी, मग मोठ्या विम्याचा फास कशाला गळ्याशी.. सरकारने आणली खास पॉलिसी..

| Updated on: Sep 21, 2022 | 6:10 PM

Insurance | मोटार वाहन विमा घेताना आता तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. जेवढी चारचाकी तुम्ही पळवाल..तेवढाच इन्शुरन्स द्यावा लागणार आहे..

Insurance | चारचाकी सतत दाराशी, मग मोठ्या विम्याचा फास कशाला गळ्याशी.. सरकारने आणली खास पॉलिसी..
जेवढा वापर तेवढाच प्रिमिअम
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : आता तुम्ही जेवढी चारचाकी (Car) पळवाल तेवढ्याच विम्याची रक्कम (Insurance Amount) मोजावी लागेल. आहे की नाही लॉटरी. विम्याची रक्कम जास्त असल्याने तुम्ही नाक मुरडल्याशिवाय काहीच करत नाही. तेव्हा आता तुम्हाला तात्काळ विम्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

जेवढा कारचा वापर असेल, तेवढाच विमा तुम्हाला खरेदी करता येणार आहे. त्याला यूज बेस इन्शुरन्स (Usage Based Insurance) स्कीमतंर्गत तुम्हाला विमा खरेदी करता येईल. त्यामुळे चारचाकी घरी उभी असली तरी वर्षाकाठी नाहक मोठी रक्कम विम्यापोटी तुम्हाला खर्च करण्याची गरज पडणार नाही.

प्रत्येक क्षेत्रात महागाईच्या झळा बसत आहे. त्याला विमा क्षेत्रही अपवाद नाही. विम्याचा प्रिमिअम वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्राला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे नाहक विमा पॉलिसीवर खर्च करण्यास वाहनधारक इच्छूक नाहीत. ते पर्याय शोधत आहेत.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमा कंपन्याही चांगल्या स्कीम बाजारात आणत आहेत. या योजना इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आणि सोयींनी युक्त आहेत. सरकारने विमा क्षेत्रात नियम बदलले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना मिळत आहे.

तर यूज बेस इन्शुरन्स (Usage Based Insurance) वा पे एज यू ड्राईव्ह स्कीम या योजनेत वाहनधारकांना सवलत मिळते. त्यांना वार्षिक विमा प्रिमिअम भरण्याची गरज पडत नाही. चारचाकी जेवढी पळवाल, तेवढाच हप्ता वाहनधारकांना द्यावा लागणार आहे.

जेवढा वापर, तेवढा प्रिमियम असा हा सर्व मामला आहे. कोरोना काळात लोकांच्या गाड्या वर्ष-वर्षभर घरासमोर उभ्या होत्या. पण त्यांना विमा कंपन्यांना संपूर्ण वर्षांचा प्रिमिअम द्यावा लागला होता. अशावेळी कंपन्यांनी UBI (Usage Based Insurance) ही अॅड-ऑन स्कीम आणली आहे.