Flipkart आणि Amazon सेलमध्ये खरेदी करायची आहे? हे तीन मूलमंत्र लक्षात ठेवा, अन्यथा होईल फायद्या ऐवजी तोटा

ऑफर मिळत आहे म्हणून तुम्हीसुद्धा खरेदीसाठी उत्सूक आहेत का? खिसा रिकामा करण्याआधी सेलमध्ये खरेदी करण्याच्या या टिप्स नक्की वाचा.

Flipkart आणि Amazon सेलमध्ये खरेदी करायची आहे? हे तीन मूलमंत्र लक्षात ठेवा, अन्यथा होईल फायद्या ऐवजी तोटा
फ्लिपकार्ट सेल
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 18, 2022 | 5:10 PM

Flipkart आणि Amazon वर 23 सप्टेंबरपासून सेल सुरू होणार आहे, ज्यांची नावे Flipkart Big Billion Sale Day आणि Amazon Great Indian Sale अशी आहेत. या दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्सपासून फर्निचरपर्यंत सर्व गोष्टींवर चांगली सूट मिळणार आहे. कंपन्यांनी काही उत्पादनांवर उपलब्ध असलेल्या आकर्षक डीलबद्दल टीझर देखील जारी केले आहेत आणि अनेक कंपन्यांनी त्यांच्या बाजूने तयारी देखील सुरू केली आहे. परंतु काहीवेळा लोक चांगल्या सवलती आणि ऑफर्समुळे  जास्त खर्च करतात. पण आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचा सेल सुरू होण्यापूर्वी अनेक टीझर समोर आले आहेत, ज्यामध्ये डील आणि डिस्काउंटची माहिती देण्यात आली आहे. परंतु कोणत्याही खरेदीला पुढे जाण्यापूर्वी, ते उत्पादन तुमच्यासाठी खरोखर उपयुक्त आहे की नाही हे लक्षात घ्या.

  1. ऑफर तपासा: Amazon आणि Flipkart वर उपलब्ध असलेल्या ऑफरकडे आकर्षित होण्यापूर्वी, ते किती खरे आहेत ते तपासा. वास्तविक, कोणत्याही उत्पादनावर उपलब्ध डील आणि सूट न पाहता, लॉन्च दरम्यान कंपनीने त्याची किंमत काय ठेवली होती ते पहा. काहीवेळा बनावट सवलती देखील सूचीबद्ध केल्या जातात, ज्यामध्ये भाबड्या ग्राहकांची फसवणूक होते.
  2. खरेदी करण्यापूर्वी वस्तूंची गरज समजून घ्या: विक्रीदरम्यान आकर्षक डीलमुळे कोणत्याही अनावश्यक वस्तू खरेदी करू नका. खरं तर, स्वस्त सौद्यांमुळे ते बऱ्याचदा विकत घेतले जातात, परंतु प्रत्येक्षात त्याची कुठलीच गरज नसते. ऑफरच्या मोहात अडकून खरेदी केलेली ती वस्तू निरुपयोगी ठरते पैसांचाही चुराडा होतो.
  3. नवीनतम उत्पादने लक्षात ठेवा: Amazon आणि Flipkart सेल दरम्यान अनेक मोबाईल आणि टॅब्लेट सूचीबद्ध केले जातील आणि त्यांच्यावर चांगली सूट देखील दिली जाईल. पण तुम्ही उत्पादन घेण्यापूर्वी विचार करता की ते उत्पादन जुने तर नाही ना? वास्तविक, बर्‍याच वेळा कंपन्यांना जुने उत्पादन अधिक सवलत देऊन विकायचे असते, परंतु लोकांसाठी तो तोट्याचा सौदा ठरतो.