AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Congress | पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन् शिवसेना रस्त्यावर, पोलिसांनाही घेरलं

Pune Congress | पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन् शिवसेना रस्त्यावर, पोलिसांनाही घेरलं

| Updated on: May 30, 2026 | 1:22 PM
Share

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेत 15 ते 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे.

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आरोपींना राजकीय संरक्षण कोण देत आहे, असा सवाल उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच निलंबित अधिकाऱ्यांबरोबरच या प्रकरणातील मुख्य जबाबदार व्यक्तींवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, गुलाबो गँगनेही पुण्यातील पर्वती पायथा परिसरात आंदोलन करत बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात हल्लाबोल केला. विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना न्याय आणि आर्थिक मदत द्यावी, तसेच दारू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दुसरीकडे, पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी कारवाई करत गावठी दारू विक्रीचे पाच अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या कारवाईनंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विषारी दारूकांड प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Published on: May 30, 2026 01:22 PM
Follow Us