मुंबई पोलीस अलर्टवर! प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट

हर्षदा शिनकर

Updated on: Jan 25, 2023 | 2:58 PM

गुप्तचर विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर... शिवाजी पार्क परिसरात कसून चौकशी सुरू

दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर परेड होत असते. या परेडची मुंबईकरांना उत्सुकता असते. मात्र शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे गुप्तचर विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर मोठा पोलीस बंदोबस्त कऱण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर होणाऱ्या परेडला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. यावर्षी मात्र गुप्तचर यंत्रणेला शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या परिसरात कसून चौकशी केली जात आहे. आज सकाळपासूनच परेडची तयारी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच खबरदारी म्हणून शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानाची कसून तपासणी केली जात आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI