4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 1 October 2022 -TV9

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात आमदार फुटल्यास तुडवा, असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असल्याचे दिसत आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Oct 01, 2022 | 1:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील मुंबई, पुण्यासह देशातील 13 शहरात 5G सेवा मिळणार आहे. या कार्यक्रमाला मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिसीव्दारे उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील गावागावात क्रांती होईल असे म्हटलं आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात आमदार फुटल्यास तुडवा, असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असल्याचे दिसत आहे. तर आज दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाची महत्वाची बैठक होणार आहे. बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. याचदरम्यान शिवसेना नेते अरविंद सवंत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. ते म्हणाले बिके हुये क्या जाने निष्ठा. तर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे हा बोगस माणूस असल्याची टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता रसातळाला गेल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें