4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 31 July 2021

गेल्या आठवड्याभरापासून देशातला कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही कोरोनाच्या केसेसमध्ये अचानक वाढ होताना दिसतेय.

गेल्या आठवड्याभरापासून देशातला कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही कोरोनाच्या केसेसमध्ये अचानक वाढ होताना दिसतेय. आपल्या राज्यात गेल्या चोवीस तासात पीआयबीच्या माहितीनुसार 6 हजार 600 नव्या रुग्णांची भर पडलीय तर देशात हा आकडा 41 हजार 49 एवढा आहे. त्यातही 41 हजार रुग्णांपैकी एकट्या केरळच्या रुग्णांची संख्या ही निम्म्यावर आहे. बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा प्रार्दुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात साडे सहा हजारापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काही रिपोर्टनुसार तर हा आकडा येत्या एक दोन दिवसात 10 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. शेवटच्या हाती आलेल्या माहितीनुसार 7 हजार 431 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत. तर 231 जणांना मात्र जीव गमवावा लागलाय. सध्यस्थितीत महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांचा आकडा हा 77 हजार 494 एवढा आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 1 लाख 32 हजार 566 रुग्णांचा बळी गेलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI