4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 25 November 2021

राज्य सरकार आता आक्रमक झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू व्हावे. अन्यथा कठोर कारवाई करू. निलंबित कर्मचारी उद्या सकाळी कामावर रुजू झाले, तर त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल. अन्यथा खैर नाही, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

एकीकडे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ केली. आंदोलकांमधील नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आझाद मैदानातून काढता पाय घेतला. मात्र, तरीही दुसरीकडे आंदोलक विलीनीकरणाच्या मुद्दयावर ठाम आहे. मुंबईत अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) आणि आंदोलनाचे नेतृत्व हाती घेतले आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, लासलगावमध्ये कर्मचारी अजूनही विलीनीकरणार ठाम आहेत.

दरम्यान, दुसरीकडे राज्य सरकार आता आक्रमक झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू व्हावे. अन्यथा कठोर कारवाई करू. निलंबित कर्मचारी उद्या सकाळी कामावर रुजू झाले, तर त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल. अन्यथा खैर नाही, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI