नवी मुंबईच्या वाशी खाडीकिनारी फ्लेमिंगो पक्ष्यांचं मनमोहक दृश्य
VIDEO | नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणथळं असल्यानं वाशी खाडीकिनारी पुन्हा एकदा फ्लेमिंगोच दर्शन, बघा व्हिडीओ
मुंबई : नवी मुंबईच्या वाशी खाडीकिनारी पुन्हा एकदा फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन घडत आहेत. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत त्या ठिकाणी फ्लेमिंगो मुंबईकरांना पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील वाशी खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील खाडी किनारा अशा फ्लेमिंगोंच्या गुलाबी रंगानी न्हाहून निघाला आहे. सध्या नवी मुंबईच्या वाशी परिसरातील एका पाणथळ जागेवर अशा फ्लेमिंगोंची झुंडच दिसून येत आहे. या पक्ष्यांचं रूप आणि सौंदर्य न्याहाळण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे. नवी मुंबईतील लहान मोठ्या पाणथळ जागांवर मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याने संपूर्ण वातावरण गुलाबी झाले आहे. या पक्ष्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

