तरुणाने आमदारासमोर मांडली लग्नाची व्यथा; व्हिडिओ व्हायरल

आमदार सुरेश वरपूडकर यांच्या समोर मांडली. हा तरुण पाथरीतील डोंगरगावचा रहिवासी आहे.

वनिता कांबळे

|

Oct 04, 2022 | 12:04 AM

परभणी : परभणीतील एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. लग्ना जुळत नसल्याने या संतप्त तरुणाने थेट आमदारासमोरच आपली व्यथा मांडली आहे. सगळ्या ग्रामस्थांसमोरच आमदारांसमोरच या तरुणाने आपले गाऱ्हाणे मांडले.

गावाला रस्ता नसल्याने लग्नासाठी मुली भेटत नसल्याची तक्रार त्याने आमदार सुरेश वरपूडकर यांच्या समोर मांडली. हा तरुण पाथरीतील डोंगरगावचा रहिवासी आहे.

रस्ता नसल्याने गावातील या संतप्त युवकाने आमदारांकडे तक्रार केल्याचा एक व्हीडिओ परभणीत व्हायरल होत आहे.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावाला स्वातंत्र्यापासून रस्ता मिळाला नाही, एका कार्यक्रमात गावात आलेले आमदार सुरेश वरपुडकर यांच्या समोर तरुणाने व्यथा मांडली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें