Video | मोठी बातमी! शिंदे गटातील नाराज अब्दुल सत्तार यांची उबाठाच्या अंबादास दानवेंशी गळाभेट
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांवरून महायुतीतील पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांवरून महायुतीतील पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. हा वाद अजून ताजा असताना अब्दुल सत्तार आणि शिवसेना (ठाकरे गट) चे अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गावर थांबून गळाभेट घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काय संवाद झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र दोघांनी हसतमुखानी एकमेकांचे अभिवादन केले. हा व्हिडिओ समोर येताच राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतेही आरोप केले नसल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. मात्र, मंत्री अतुल सावे यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला. गेल्या 18 महिन्यांत नगरपरिषद आणि नगरपालिकांना कोणताही निधी मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अतुल सावे यांनी आम्हाला कधीही मदत केली नाही, असेही सत्तार म्हणाले होते.
Published on: Jun 02, 2026 12:55 PM
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..

