Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… E-Kyc बद्दल मंत्री आदिती तटकरेंकडून मोठी घोषणा, आता…
मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजने अंतर्गत ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नैसर्गिक आपत्तीमुळे कागदपत्रे गमावलेल्या महिला तसेच विधवा आणि एकल महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अंगणवाडी सेविकांमार्फत कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अनेक पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या काळात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे गमावली होती. याचा परिणाम ई-केवायसी करण्यावर झाला होता.
याशिवाय, विधवा, एकल आणि विभक्त झालेल्या महिलांना (डिव्होर्सी) ई-केवायसी करताना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. आता या महिला त्यांच्या अंगणवाडी सेविकांकडे त्यांची कागदपत्रे उपलब्ध करून देऊन ई-केवायसी प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करू शकतात. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, त्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले.
Published on: Nov 28, 2025 11:05 PM
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
