जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक… आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पीआरओ म्हणून काम करणाऱ्या आशिष मेटे या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. भांडूपमध्ये इमारतीच्या आवारात ॲसिडिटीचा त्रास झाल्याने ते कोसळले आणि डोक्याला मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पोलिसांनी एडीआर दाखल करत तपास सुरू केला आहे.
मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पीआरओ (जनसंपर्क अधिकारी) म्हणून काम करणाऱ्या आशिष मेटे या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील भांडूप परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. आशिष मेटे हे काल रात्री त्यांच्या पार्टनरच्या घरी जेवणासाठी गेले होते. प्राथमिक माहितीनुसार, जेवणानंतर त्यांना ॲसिडिटीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर ते इमारतीच्या खाली उतरून चालत असताना अचानकपणे कोसळले.
कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आशिष मेटे हे आदिती तटकरे यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच एका खासगी कंपनीच्या माध्यमातून जनसंपर्काचे काम पाहत होते. भांडूप पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
Published on: Aug 31, 2026 03:23 PM
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार

