Baba Siddique dead : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू, नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकी यांच्यावर आज रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
अजित पवार गट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. या गोळीबाराच्या घटनेमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बाबा सिद्धिकी हे ज्येष्ठ नेते आहे. बाबा सिद्धिकी यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. १२ फेब्रुवारी २०२४ ला बाबा सिद्धिकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्धिकी हे १९९९, २००४ आणि २००९ साली सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर बाबा सिद्धिकी यांनी राज्यमंत्री पदाची देखील धुरा सांभाळली होती.
Published on: Oct 12, 2024 10:52 PM
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
