Ajit Pawar : .. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
Ajit Pawar Statement News : अजित पवार यांनी स्वत:च्या अंबानी यांच्यावरील विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.
वेगळं काही बोललो असेन तर राजकारण सोडेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. अंबानींच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी हे विधान केलं आहे.
अजित दादांच्या धीरूभाई अंबानींवरच्या वक्तव्यावरून सध्या राजकारण पेटलंय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात दादांनी धीरूभाई अंबानींचं उदाहरण दिलं. धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्यधीश झाले असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मात्र सुरुवातीला ऐकताना सोडून हा शब्द चोरून असा वाटला. सोशल मीडियात स चा च झाला आणि दादांचं वक्तव्य व्हायरल झालं. विरोधकांनी त्यांच्यावर यावरून जोरदार टीका देखील केली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत वेगळं काही बोललो असेन तर राजकारण सोडेल, असं म्हंटलं आहे.