“अजितदादा राजकारणातले अमिताभ बच्चन”, सुप्रिया सुळेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले, “भावाच्या प्रेमापोटी…”
सुप्रिया सुळे यांनी अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटात असावा, असं सगळ्यांना वाटते. अमिताभ बच्चन यांचा आवाज चालतो. त्यांचा फोटो, त्यांचा लूक चालतो. अमिताभ बच्चन यांचे ऑटोग्राफसुद्धा चालते. दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे अमिताभ बच्चन आहेत," असं विधान केलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद : मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये येण्यासाठी खुली ऑफर दिली. “अजित पवार यांच्याबदद्ल अतिशय आदर आहे. ते विरोधी पक्षाचे जबाबदार नेते आहेत. अजित पवार बोलतात, तेव्हा लोकं त्याला सिरीअसली घेतात. त्यामुळे अजित पवार यांनी सरकारमध्ये यावं, अशी आमची अपेक्षा आहे. ते सोबत आले तर आम्हाला आनंद होईल”, अशी ऑफर दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना दिली. यावर सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं. त्या म्हणाल्या की, “अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटात असावा, असं सगळ्यांना वाटते. अमिताभ बच्चन यांचा आवाज चालतो. त्यांचा फोटो, त्यांचा लूक चालतो. अमिताभ बच्चन यांचे ऑटोग्राफसुद्धा चालते. दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे अमिताभ बच्चन आहेत”. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुप्रिया सुळे माझी बहीण आहे. भावाच्या प्रेमापोटी ती मला अमिताभ बच्चन म्हणाली असेल. पण तुम्ही तेवढं मनावर घेऊ नका.”, असं अजित पवार म्हणाले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

