राष्ट्रवादीच्या 20-25 आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर 20 ते 25 आमदारांनी शंका उपस्थित करत सुनेत्रा पवारांची भेट घेतली. या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. आमदारांनी मुख्यमंत्र्यांनाही भेटून तीव्र भावना व्यक्त केल्या.
अजित पवारांच्या विमान अपघातावरून निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर 20 ते 25 आमदारांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनील तटकरेंच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या भेटीत आमदारांनी अपघाताच्या प्राथमिक अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनेत्रा पवारांनी आमदारांना सांगितले की त्या पार्थ पवारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, अपघाताची योग्य आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली जाईल.
या बैठकीत, आमदारांनी अपघाताच्या अहवालावरून शंका घेतल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र दिले होते, परंतु अद्याप कोणतीही चौकशी सुरू न झाल्याबद्दलही आमदारांनी विचारणा केली. अपघातानंतर सापडलेल्या दादांच्या वस्तू (चप्पल, घड्याळ, मोबाईल, बॅग) पाहून आमदार भावनाविवश झाले. अजित पवारांच्या कुटुंबीयांच्या मते रोहित पवारांची चौकशीची भूमिका योग्य आहे.
Published on: Mar 06, 2026 10:03 AM
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
